युवराज सिंग जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. या अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने एकहाती सामने भारताला जिंकून दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर भारताला 2007 अाणि 2011 साली झालेले विश्वचषक जिंकून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली अाहे.

युवराज सिंग

युवराज सिंगने नुकतेच एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. तो म्हणाला की, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत या तिघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाल करु शकतात. या तिघांमध्ये त्याला स्वत ची झलक दिसत असल्याचे सांगितले.

सध्याचा युवराज सिंग तु कोणत्या खेळाडूत पाहतो?असा प्रश्न विचारल्यानंतर युवराज टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला, ‘टीम इंडियाला मधल्या फळीत काही चांगले हिटर मिळाले आहेत. आमच्याकडे रिषभ पंत, हार्दिक पंड्या आहे. मला वाटते रिषभ आणि हार्दिक अधिक वनडे आणि टी -20 सामने एकत्र खेळत आहेत. त्यांची ही एक अतिशय स्फोटक जोडी आहे.

तो पुढे म्हणाला की, रवींद्र जडेजा पुनरागमन करत आहे.  त्यामुळे हे तिघेही कधीही सामना बदलू शकतात. एकदिवसीय आणि टी -20 क्रिकेटमध्ये जडेजाने बर्‍यापैकी सुधारणा केल्या आहेत. लेफ्ट-राइट कॉम्बिनेशन नेहमीच धोकादायक असते, जसे धोनी आणि मी करायचो. तर मी ऋषभ, हार्दिक आणि जडेजा या फलंदाजांना  5, 6 आणि 7 स्लॉटमध्ये फलंदाजी करताना पाहण्यासाठी फारच उत्सुक आहे.

 

Advertisement -

उल्लेखनीय आहे युवराज सिंगकी पंत, जडेजा आणि पंड्या यांनी अलिकडच्या काळात टीम इंडियासाठी निश्चितच चांगली कामगिरी केली आहे. आता युवराजच्या अपेक्षांवर ते उतरु शकतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत एकत्र दिसू शकतात. ही मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्याचवेळी शिखर धवन यांच्या नेतृत्वात श्रीलंकेत गेलेल्या टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याचाही समावेश आहे. भारत 13 जुलैपासून श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय  मालिका खेळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here