जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

भारतातील या 5 गुप्त असलेल्या पर्यटन स्थळी तुम्ही एकवेळ तरी जायलाच हवे.


 

आपल्याला जाणून आश्चर्य होईल की आजूनही भारतात काही असे गुप्त स्थान आहेत जे आजुनही भारतातील 60% पर्यटकांना माहिती नाहीयेत.

होय पर्यटन विभागामार्फत केल्या गेलेल्या सर्वेमधून हा खुलासा झाला आहे. या सर्वेमधून हे सिद्ध झाले आहे की,देशातील मोठ्या प्रमाणात पर्यटक हे काही मोजक्याच आणि नावाजलेल्या ठिकाणीच पर्यटणास जाण्यास पसंद करतात.

असं असलं तरी आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भारतातील 5 अश्या स्थळाबद्दल सांगणार आहोत जेथे आजपर्यंत अत्यंत कमी लोकांनी भेट दिली आहे. हे पर्यटन स्थळ निसर्गाच्या अलौकिकतेने नटलेले असून या ठिकाणी तुम्ही आयुष्यात एकदातरी नक्कीच भेट द्यायला हवी.

Advertisement -

पैंगोंग झील, जम्मू आणि काश्मीर

‘थ्री इडीयट’ चित्रपटात दाखवली गेलेल्या या झीलचा नजारा हा डोळ्यांना तृप्त करणारा आहे.
याच्यासोबतच लेह आणि लदाखची नैसर्गिक देणगी सुद्धा तुम्ही पाहू शकता. हिमालय पर्वताच्या उंच भागात ही नदी आहे. जेथे तुम्ही जाऊन पर्यटणाचा लाभ घेऊ शकता.

माजुली आसाम

पर्यटन

आसाम मध्ये माजुली ब्रम्हपुत्र नदी मध्ये असणारा हा सर्वांत मोठा द्विप आहे. जो तुमच्या विकेंडच्या पर्यटनाचा मोठा आनंद मिळून देऊ शकतो. आजूबाजूला पूर्णपणे पाणी आणि आतमध्ये या द्विपावर तुम्ही हा नजारा तुम्ही एकदातरी आयुष्यात नक्कीचं अनुभवला पाहिजे.

तवांग, अरुणाचल प्रदेश.

अरुणाचल प्रदेशमधील हिल स्टेशनपैकी एक असलेल तवांग हे तुमच्या विकेंड ट्रिपसाठी अत्यंत समाधानकारक असं ठिकाण आहे. नैसर्गिक सुंदरता आणि थंड वातावरण यामुळे तुमची सुट्टी येथे नक्कीच आनंदात जाईल. तवांग भारतातील
सिक्रेट स्थळापैकी एक आहे. या ठिकाणी जाण्यासाठी सहसा जास्त लोकं धाडस करत नाहीत. सतत होणारे भूस्खलन आणि कठोर वातावरनामुळे या ठिकाणी पोहचणे अवघड जाते.

पर्यटन

तारकरली बीच, महाराष्ट्र

मुंबईपासून काही तसाच्याच अंतरावर असलेलं तारकरली बीचं तुम्हाला समुद्राच्या पाण्याची एक स्पष्ट असा नजारा दाखवते. हे बीच पर्यटकांसाठी स्वर्गचं असल्यासारखं आहे. या ठिकाणी स्कुबा ड्रायविंग करणे लोकांना खूप पसंद आहे. तुम्ही या ठिकाणी आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी नक्कीच जाऊ शकता.

पर्यटन

लेपचजगत, पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये दर्जीलिंग जवळ एक लहानशी जागा आहे जी भारतातील जास्त लोकांना माहिती नसलेली जागा आहे. लेपचजगत दाट झाडीमध्ये स्थित आहे. दर्जिलिंग लेपचजगतच्या जवळ स्थित असल्यामुळे पर्यटक या जागेला जास्त प्रमाणात भेट देत नाहीत. परंतु निसर्गाचे अलौकिक दर्शन घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट द्या.

तरं मित्रानो हे होते भारतातील काही गुप्त स्थान ज्याठिकाणी तुम्ही आयुष्यात एकदातरी भेट नक्की द्यायला हवी. आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला तें आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here