जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

आशियातील सर्वात उंच युवक ‘यशवंत’चा विक्रम अबाधित,लोक त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडतात.


सोलापूर : ६ फूट ८ इंच उंच असलेला यशवंत राऊत हा  सोलापूरचा उंच कुमार म्हणून प्रसिध्द आहे. आपल्या उंचीमुळे त्याने सोलापूरचा जगभर लौकिक केला आहे. २०१६ साली दहावीत असताना वयाच्या १६ व्या वर्षी तो आशियातील सर्वात उंच युवक ठरला होता. त्याचा हा विक्रम अद्याप अबाधित अाहे.

वयाच्या १४व्या वर्षी त्याला ६ फूट ७ इंच उंचीमुळे २०१४ साली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् अाणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या संस्थेने तर त्याला टॉलेस्ट टीनएजर ऑफ इंडिया या किताबाने  गौरवले होते.

सोलापूर शहरातील नवीन आरटीओ ऑफिसजवळ अादित्यनगर येथे राहणारा यशवंत राऊत हा वर्ल्ड रेकॉर्डस्, एशियन रेकॉर्डस्, इंडियन रेकॉर्डस् चे जुरी म्हणून काम पाहत आहे. ज्युरी म्हणून काम पाहात असताना ८० जणांनी रेकॉर्ड्स केले आहेत. सध्या तो पुणे येथून डीईएस नवलमल फिरोडिया लॉ कॉलेजमधून कायदेविषयक शिक्षण घेत आहे. कायदेविषयक शिक्षणासोबत आपल्या वडिलांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीदेखील कसतो. यशवंतच्या शारिरीक उंचीमुळे अनेकजण त्याचा खूप रिस्पेक्ट करतात. लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडतात. लोकांकडून मिळणारे हे प्रेम पाहून तो भारावून जातो.

यशवंत

Advertisement -

यशवंत, त्याला लभलेली उंची तो गॉड गिफ्ट मानतो आणि त्याला त्याच्या उंचीबद्दल आजही अभिमान आहे. त्याला अातापर्यंत १२ पेक्षा जास्त संस्थानी गौरविले अाहे. २०१६ साली दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के.जी. बालकृष्णा यांच्या हस्ते भारत गौरव अवॉर्डने त्याला गौरवण्यात आले होते. त्याचे वडील ब्रह्मदेव अाणि अाई सुमन हे दोघेही शिक्षक अाहेत. तर त्याला त्रिवेणी नावाची बहिण अाहे. त्याच्या घरात यशवंतच सर्वाधिक उंच अाहे. मात्र त्याची उंची त्याला बर्‍याच अडचणी सामना करावा लागतो. त्याच्या मापाचे कपडे आणि बुट त्याला मिळत नाहीत. यासाठी त्याला अतिरिक्त पैसे देऊन ते परराज्यांतून खरेदी करावी लागतात.

अजून वाढेल उंची  -यशवंत राऊत

यशवंत म्हणाला की, २०१४ ते २०१६ या वर्षात केवळ एक इंच उंची वाढली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणखीनही उंची वाढू शकते. आमच्या घरात पूर्वी इतके उंच कोणीच नव्हते. मला व्यायामाची प्रचंड आवड आहे. मी बास्केटबॉल खेळतो. या खेळामध्ये त्य उंचीसाठी फायदा झाला. जिममध्ये जाऊन मी व्यायाम करत असतो. जास्त उंची असल्यामुळे मी बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करु शकत नाही. सोलापुरमधून जास्तीत जास्त रेकॉर्डस् व्हावे अशी माझी इच्छा अाहे. ज्यांच्याकडे कौशल्य अाहे, ज्यांना विविध क्षेत्रात रेकॉर्ड करायचे आहे, पण प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही, अशांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी त्यांना मदत करू शकतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here