जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\

===

या देशात झाली होती जगातील सर्वांत मोठी चोरी,लुटले होते एवढे पैसे…

 


 

आपण चोरीच्या अनेक कथा ऐकल्या असतील शिवाय चित्रपटात सुद्धा चोरीच्या अनेक घटना पहिल्या असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या एका बँकेतील चोरीबद्दल सांगणार आहोत जी चोरी इतिहासातील आजपर्यंतची सर्वांत मोठी चोरी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या चोरीत चोरी झालेल्या देशातील राष्ट्रपतींचा मुलगा सुद्धा सामील होता. हो ही गोष्ट एकदम खरी आहे.

या बँकेच्या चोरीमध्ये एकूण एक बिलीयन डॉलर म्हणजेच आजच्या भारतीय चलनानुसार 7562 करोड रुपये लुटले गेले होते.

Advertisement -

चोरी

ही घटना आहे इराकच्या सेंट्रल बँकमधील. कोणत्याही देशाच्या सेंट्रल बँकेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम चोरी करण्याची ही पहिली वेळ होती. या घटनेला 18 वर्ष झाली आहेत.

ही घटना मार्च 2003साली घडली होती. त्यावेळी इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेन होते आणि त्यांचे अमेरिकेसोबतचे संबंध युद्धसदृश्य होते. असंही म्हटल जाते की त्यावेळी अमेरिकेने इराक वर हल्ला करण्याची सर्व तयारी केली होती. त्याच वेळी हुसेन यांचा मुलगा सेंट्रल बँकेत गेला होता आणि तेथील कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हातात एक चिट्टी दिली.ज्यात लिहले होते की, देशातील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने बँकेतील सर्व पैसा दुसऱ्या जागी हलवायचा आदेश दिला आहे.

त्यावेळी इराक मध्ये हुसेनचा मोठा धाक होता. कारण त्याला ताणशाह समजले जायचे. त्यामुळे बँक प्रमुख काहीही न म्हणता त्यांनी पैसे घेऊन जाण्यास परवानगी दिली. तस पाहिलं तरं याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गही नव्हता.

असं म्हटलं जाते की हुसेनच्या मुलाने या बँकेतून एवढे पैसे लुटले होते की तें घेऊन जाण्यासाठी त्याला कित्येक कंटेनर बोलवावे लागले होते. पैसे भरून घेऊन जाण्यासाठी त्याला तब्बल सहा तास लागले होते.

चोरी

असंही म्हटलं जात की एवढे पैसे नेऊन सुद्धा बँकेत आणखी पैसे शिल्लक सापडले होते. जे हुसेनच्या पोराने कंटेनरमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे बँकेत सोडले होते.

या घटनेची माहिती इराकच्या लोकांना तेव्हा कळाली जेव्हा घटनेच्या काही दिवसांतच अमेरिकेने इराकवर बॉम्बहल्ले सुरु केले. या दरम्यान अमेरिकी सैन्याने इराकच्या सेंट्रल बँकवर कब्जा केला,तेव्हा त्यांना कळले की बँकेत तरं काहीही पैसा शिल्लक नाहीये. बँकेतील सर्व पैसासद्दाम हुसेनचा मुलगा घेऊन गेला.

या प्रकरणात बराच तपास करण्यात आला. सद्दाम हुसेनच्या महालात सुद्धा शोध घेण्यात आला जेथे काही प्रमाणात पैसे सापडले. परंतु लुटलेल्या एकूण रकमेपैकी त्यांना 5% सुद्धा रक्कम परत मिळाली नाही. सद्दामच्या मुलाने ही रक्कम कशी आणि कुठे गायब केली याचा पत्ता आजही कुणालाही लागला नाहीये.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here