आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ज्या दिवशी मदर्स डे असेल त्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात तो दिवस साजरा करतो तसेच फादर्स डे दिवशी सुद्धा आपण मोठे सेलिब्रेशन करतो आणि फादर्स सुद्धा करतो. भारत तसेच अनेक देशात जून मधील तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो, खूप मुले आपल्या वडिलांच्या हातून केक कापतात आणि डे साजरा करतात तसेच आपण आज अशा पण कृती करतो जे आपल्या वडिलांना आवडतात. चला तर आज आम्ही तुम्हाला पितृ दिवस बद्धल माहिती सांगणार आहोत.

फादर्स डे
फादर्स डे

आपले वडील जरी आपल्याला प्रेमाने बोलत नसतील तरी ते शब्द एक नारळासारखे असतात जसे की वरून कठीण पण आतून नरम, याचा अर्थ असा की जरी ते वरून प्रेम दाखवत नसतील तरीही आतून त्यांचे हदय आपल्यासाठी असते. जसे आपली आई आपल्यावर प्रेम करते तसेच आपले वडील सुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतात. प्रत्येक वडील आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करत असतात, आणि आपण आपल्या वडिलांच्या कष्टानं धन्यवाद करण्यासाठी फादर्स डे साजरा करतो.

१९०९ पासून मदर्स डे ची प्रेरणा घेत फादर्स डे सुद्धा साजरा करण्यास सुरू केले, वॉशिंग्टन मधील स्पोकेन शहरातील सोनोरा डॉड या व्यक्तीने पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता. १९०९ मध्ये ज्यावेळी वॉशिंग्टन मधील स्पोकेन शहरात मदर्स डे विषयी एक कार्यक्रम घेतला होता आणि आईचे महत्व काय असते ते सांगत होते त्यावेळी डॉड ला असेही वाटले की आपण फादर्स डे पण साजरा करू शकतो, काही लोकांचे असे म्हणणे आहे की आपले जे पूर्वज होते त्यांच्या आठवीत आपण हा डे साजरा करतो.

Advertisement -

१९१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वुडरो विल्सन यांनी फादर्स डे साजरा करण्यास मान्यता दिली आणि १९२४ मध्ये जेव्हा नवीन राष्ट्रपती कैल्विन कुलिज झाले त्यांनी या डे ला राष्ट्रीय फादर्स डे म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. १९६६ मध्ये राष्ट्रपती लिंडन जॉनसण यांनी पहिल्यांदा जून मधील तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यास सांगितले आणि तेव्हापासून आपल्याकडे फक्त न्हवे तर सर्व देशात जूनच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यास सुरू केले.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here