आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

रेल्वेच्या मागे मोठ्या अक्षरात लिहल्या जाणाऱ्या ‘X’चा अर्थ काय असतो? आणि ते का लिहले जात? घ्या जाणून सविस्तर..!


जास्तीत जास्त लोक ट्रेन मध्ये प्रवास करतात कारण ट्रेन मध्ये तिकीट सुद्धा कमी असते आणि लवकर पोहचते, प्रवास करताना आपण बाहेर पाहिले तर खूप चिन्हे दिसत असतात. ट्रेन मध्ये एक असे चिन्ह आहे की जे सर्वात लास्ट च्या डब्याच्या असते आणि ते म्हणजे “एक्स” चे चिन्ह.

ट्रेन
ट्रेन

आपण खूप वेळ हे चिन्ह पाहतो पण काही लोकांना हे माहीत नसते की या चिन्हाचा अर्थ नक्की काय आहे. आम्ही आपणाला सांगू इच्छितो की भारतामध्ये जी ट्रेन चालते त्या ट्रेन वर पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगात हे चिन्ह दिसत असते.

या चिन्हामागील असे रहस्य आहे की प्रत्येक मोठ्या वाहनाच्या मागे हे चिन्ह असणे आवश्यक असते, हा नियम भारतीय रेल्वे ने बनवला आहे. या सोबत अनेक गाड्यांवर एलवी लिहलेले असते तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. तसेच काही गाड्यांच्या मागे लाल दिवस सुद्धा लखलखत असतो. जेव्हा कोणत्या ट्रेन वर एलवी असे लिहलेले असते याचा अर्थ असा की लास्ट व्हेईकल. म्हणजे सर्वात शेवटच्या डब्यात प्रशिक्षक असतो.

हे ‘एलव्ही’ नेहमी ‘एक्स’ चिन्हाने लिहिलेले असते. जेव्हा कोणत्याही ट्रेनच्या मागे एक्स चिन्ह असते त्यावेळी तो कर्मचार्‍यांना असे दर्शवतो की तो रेल्वेचा शेवटचा डब्बा आहे आणि जर एखाद्या ट्रेनमागे हे चिन्ह नसेल तर याचा अर्थ असा की ट्रेन आपत्कालीन परिस्थितीत आहे.

Advertisement -

तसेच ट्रेनच्या मागे लाल रंगाचे लाईट आपल्याला दिसत असते, ती लाईट ट्रॅक वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असते याचा अर्थ असा की ट्रेन त्या जागेवरून निघाली आहे. जेव्हा वातावरण खराब असते त्यावेळी ही लाईट त्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करते त्यांना सिग्नल देते. तसेच ही लाईट पाठीमागून येणाऱ्या ट्रेन ला सुद्धा इशारा करते.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here