जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या कारणामुळे रस्त्यावरील टाॅमी गाड्यांच्या मागे लागतात, विशेष आहे त्यामागचे कारण…!


जेव्हा रात्रीच्या वेळेस रस्ता मोकळा असतो आणि आपण एखाद्या परिसरातून चाललेले असतो,तेव्हा आपण कोणत्या तरी एका गल्लीत गाडी घालतो आणि अचानक काही टाॅमी आपल्या मागे लागतात? आपण अधिक घाबरतो आणि काही वेळेस आपण गाडी आणखी फास्ट चालवतो, आणि अचानक कुत्रा आपल्या पायांचा चावा घेतो.

अनेकदा आपण या एका गोष्टीचा विचार करतो ती गोष्ट म्हणजे कुत्रे गाड्यांचा पाठलाग का करतात किंवा गाडीच्या मागे का लागतात.या मागील कारण शोधल्या नंतर दोन गोष्टी समोर आल्या.पहिली गोष्ट म्हणजे कुत्रे नेहमी गाडीच्या चाकांवरच मूत्र करतात.

टाॅमी

जेव्हा ते मूत्र करतात तेव्हा त्यांनी ती गोष्ट स्वताच्या हक्काची वाटू लागते.जेव्हा अशा गाडी दुसऱ्या एखाद्या परिसरातून जाते तेव्हा त्या परिसरातील कुत्र्यांना त्या चाकावर केलेल्या मूत्राचा उग्र असा वास येतो.त्यामुळे त्या कुत्र्यांना वाटतं की त्यांच्या परिसरात दूसरा कोणी कुत्रा आला आहे,त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी ते सर्व कुत्रे चालत्या गाडीच्या मागे धावतात.

Advertisement -

जसे की तुम्ही समजा रविवार पेठेत राहतात आणि तुमच्या गाडीच्या चाकावर कुत्र्याने मूत्र केले आणि तुम्ही गाडी घेऊन इतर ठिकाणी गेला तर तेथील कुत्रे तुमच्या मागे लागतात.

गाडीमागे कुत्रे लागण्याचे अजून एक कारण म्हणजे जेव्हा अंधारात किंवा रात्रीच्या वेळेस गाडीवर चाललेले असतात तेव्हा कुत्र्याला वाटते त्यांच्या पेक्षा कोणीतरी लहान प्राणी चालला आहे जेव्हा तुम्ही कुत्र्याला घाबरून गाडी पळवता तेव्हा तर कुत्र्याला वाटते तुम्ही घाबरला आहात त्यामुळे ते तुम्हाला अधिक घाबरवते.त्यामुळे जर कधी गाडी चालवताना कुत्रा तुमच्या मागे लागला तर न घाबरता तुम्ही हळूच गाडी चालवा.तो नक्कीच तुम्हाला चावणार नाही.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here