जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads
……………………………………………………………………………………………………………

या अभिनेत्यामूळे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आजपर्यंत सिंगल आहे.

अजय देवगण याचे नाव येताच शांत, गंभीर आणि उत्कृष्ट अभिनेत्याची प्रतिमा आपल्या मनात निर्माण होते. आज त्याला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये २६ वर्षे झाली आहेत. तो आज जितका चांगला कलाकार आहे तितकाच तो लहानपणी सुद्धा होता.

 

अजय देवगनने आपले असे नाव केले आहे की त्याची फॅन फॉलोईंग भारतात तसेच जगभरातील देशांमध्ये आहे. आज जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी बाल कलाकार म्हणून आपले करिअर सुरू केले आणि अजय देवगन सुद्धा त्यामधीलच एक आहे.

 

तब्बू
तब्बू

 

त्याने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले होते. बालपणीचा त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षकांना समजले होते की हा मोठा झाल्यावर बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावेल.

 

पण आज आम्ही आपल्याला अजय देवगनच्या अशा प्रेमकहाण्या सांगणार आहोत जा आपल्याला कदाचित माहित नसतील. त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अजयचे नाव बॉलिवूडच्या अनेक नामांकित अभिनेत्रींशी सं-बंधित होते. अजयशी सं-बंधित सर्व अभिनेत्रींचे आता लग्न झाले असताना एक अभिनेत्री अशी आहे जी आज पर्यंत अजयमुळे लग्न करू शकली नाही.

 

सुंदर असूनही तिने आजपर्यंत लग्न केलेले नाही आणि ही अभिनेत्री कोणी छोटी मोठी अभिनेत्री नसून बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण अजय देवगणच्या काही प्रसिद्ध हुकअपबद्दल बोलूया.

 

त्यावेळी अजय देवगन बॉलीवूडची राणी अर्थात रवीना टंडन हिच्या फार प्रेमात होता. त्यावेळी अजयची रवीनाबरोबरची जोडी चांगलीच गाजली होती. त्या काळात ते एकमेकांच्या प्रेमात पडले परंतु ते कधीही एक होऊ शकले नाहीत. रवीनाशिवाय अजय देवगणचे नाव इतर बऱ्याच नायिकांशी सं-बंधित होते. रवीना नंतर त्याचे नाव करिश्मा कपूरशी सं-बंधित होते.

 

असं म्हणतात की करिश्मामुळे अजय आणि रवीनाचा ब्रेकअप झाला होता. इतकेच नाही तर तिच्यामुळेच बऱ्याच चित्रपटांतून तिला काढून टाकण्यात आल्याचा आरोप रवीनाने करिश्मावर केला होता. तेव्हा करिश्माला हे आवडले नाही आणि तिने तेव्हा पासून अजय आणि रवीनापासून थोडे अंतर ठेवले.

 

यानंतर त्याचे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूशी जोडले गेले होते आणि रिपोर्ट्सनुसार तब्बू अजय देवगणवर अजूनही खूप प्रेम करते.

तब्बू
तब्बू

 

वास्तविक, तब्बू आणि अजय यांनी 90 च्या दशकात एकत्र अनेक चित्रपट केले आणि त्याचवेळी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तब्बूने अजयवर अगदी मनापासून प्रेम करायला सुरुवात केली.

 

पण कदाचित अजयचं हे प्रेम खरं नव्हते, आणि मग त्याच्या आयुष्यात काजोलची एन्ट्री झाली.

 

आपल्याला माहित आहे की अजयने काजोलबरोबर बर्‍याच सिनेमांमध्ये काम केले आहे आणि त्यामुळेच त्याचा कल काजोलकडे होता आणि हळू हळू दोघे एकमेकांच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तब्बू मात्र बिन विवाहाची राहिली, आणि एका वृत्तानुसार तब्बूने याच कारणांमुळे अजून पर्यत लग्न केले नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here