आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

जाणून घ्या,म्युकरमायकोसिस आणि काळी बुरशी चा संबध नक्की काय आहे..


गेले दीड वर्ष झाले कोरोनाने आपले वर्चस्व मांडले आहे मग त्यामध्ये पहिली लाट येऊन गेली त्यामध्ये खूप लोकांचे नुकसान झाले तो पर्यंत कोरोनाची दुसरी लाट येऊन ती आत्ता कमी होत चालली आहे कारण गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या हळुवार घटत चालली आहे त्यामुळे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी मुलाखतीत मुंबईमध्ये जे निर्बंध लावले आहेत ते थोडे शिथिल केले आहेत.म्युकरमायकोसिस

आत्ता हळू हळू पावसाने सुरुवात केलीच आहे तसेच बऱ्याच भागात पाऊसही चालू झाला आहे. पण पाहायला गेले तर असे काही ऋतू ठरवून नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये पाऊस पडत आहे.

आत्ता पावसाळा म्हणले की वेगवेगळे आजार सुद्धा आपले आगमन करतात, आधीच कोरोना आणि त्यामध्ये हे आजार. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे कारण पावसाळ्यात बुरशीजन्य आजार असतात आणि त्यात अत्ता काळी आणि पांढरी बुरशीचा पण आजार आला आहे.

सध्या जे भारतात संकट चालू आहे ते म्हणजे ब्लॅक फंगस, तुम्ही सोशल मेडियाद्वारे सुद्धा पाहिले असेल की सगळीकडे हेच सांगतायत की घरात ज्या पदार्थांवर बुरशी जसे की कांदे किंवा आपला फ्रीज असतो त्याच्या आत जी रबर असते त्यावर सुद्धा बुरशी असते त्यामुळे तुम्ही सावधान राहिले पाहिजे.

म्युकरमायकोसिस

पण जेव्हा याची सत्यता समजली त्यावेळी कळलं की कांदा आणि फ्रिजमधील बुरशी वेगळी असून त्याचा संबंध ब्लॅक फंगसशी आजिबात नाही.

म्युकरमायकोसिस म्हणजे एक काळी बुरशी नसून हा फ्या लोकांना आजार होतो जसे की आपल्या शरीरात रक्त कमी पडले की आपल्या शरीराची त्वचा काळी पडायला लागते तसेच जे लोक स्टेरॉईड घेतात तसेच ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांना हा रोग होण्याची शक्यता असते.

सध्या या रोगाच्या रुग्णाची लोकसंख्या हळुवार पणे वाढत आहे आणि याचे उपचार सुद्धा खूप महाग असल्यामुळे आपल्या देशात सध्या यावर मोफत उपचार चालू आहेत असे आपले आरोग्यमंत्री सुद्धा म्हणले आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here