क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

विराट कोहलीच्या कर्णधार पदाच्या राजीनाम्यामुळे टीम इंडियाचे होणार या बाबतीत नुकसान


भारतीय क्रिकेट टीम मध्ये होणाऱ्या बदलांची नांदी इंग्लंडच्या दौऱ्याच्या वेळीच झाली होती. आयसीसी टी२० टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विराटने आयपीएलच्या यंदाच्या सिझन नंतर ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’ (RCB) च्या कर्णधारपदाचाही राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. २०१३ पासून विराट आरसीबी च्या टीमचे आयपीएल मध्ये नेतृत्व करत आहे. जरी विराटच्या जागी दुसरा कर्णधार नियुक्त करण्यात आला, तरी त्याच्या या निर्णयाचा भारतीय क्रिकेट संघावर गंभीर परिणाम होणार आहे.

 

संघाचा घटलेला उत्साह
विराटच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आक्रमक वागण्याने नेहमीच भारतीय संघाचा उत्साह आणि जोश कायम ठेवला आहे. त्याच्या या आक्रमक खेळीचा आजपर्यंत भारतीय संघाला बराच फायदा झालेला आहे. विरोधकांना उत्तर देणे त्यामुळे सोपे जात होते. त्याच्या कर्णधार नसण्याने हा आक्रमकपणा कमी अनुभवायला मिळेल आणि त्यामुळे भारतीय संघाचा जोशही तितकासा राहणार नाही.

Virat Kohli

Advertisement -

ऑस्ट्रेलियातील विश्वकप सामन्यांवर परिणाम
२०२२ मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील विश्वकप सामन्यांच्या तयारीसाठी नव्या कर्णधाराला जास्त वेळ मिळणार नाहीये. त्याचा परिणाम संघाच्या एकूणच कामगिरीवर होऊ शकतो. विराटकडे ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे. मात्र नवीन कर्णधाराकडे तो असेलच याची खात्री नाही. या गोष्टीचा फटका सामन्यांमध्ये बसू शकतो.

 

फलंदाजीवर परिणाम
कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्या कमी झाल्यावर विराटची फलंदाजी सुधारेल असे बऱ्याच जणांचे मत असले, तरी तज्ज्ञांच्या अंदाजानुसार विराटच्या फलंदाजीवर या राजीनाम्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्या फलंदाजीचा दर्जा खालावण्याच्या शक्यता जास्त आहेत.

 


हेही वाचा:

MI vs CSK live: थाला पुन्हा फेल! जीम्मेदारीच्या वेळी धोनीने टाकली स्वतःची विकेट,चाहते नाराज..

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here