क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

पहिल्या २६ चेंडूंत ४० धावा, मग नंतर १५ चेंडूंत फक्त १३ धावा का? विराटच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह


शारजाहच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ३५ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा सहा गडी राखून पराभव केला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवर शंका व्यक्त करण्यात आली आहे.

 

नाणेफेक हरल्यानंतर आरसीबी कडून विराट कोहली आणि देवदत्त पदिक्कल फलंदाजीसाठी आले. दोघांची फलंदाजी पाहताना आरसीबी किमान २०० धावा करेल असे वाटले होते, मात्र १३.२ षटकानंतर १११ धावा करून संघाची धावसंख्येची गती मंदावलेली दिसून आली. अखेर ६ बाद १५६ धावा करून आरसीबी ला हार पत्करावी लागली.

Virat Kohli

Advertisement -

नंतर या सामन्याची चर्चा करताना भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आणि माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी विराटच्या फलंदाजीवर प्रशचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, की कोहलीने या सामन्यात शानदार सुरुवात केली. त्याने काही अतुलनीय षटकारही मारले.

 

पुढे मांजरेकर म्हणाले, की चांगली सुरुवात करूनही त्याने आपला वेग का कमी केला ते कळत नाही. १५३.८४ च्या स्ट्राईक रेटने त्याने पहिल्या २६ चेंडूंत ४० धावा केल्या. मात्र पुढच्या १५ चेंडूंत त्याचा स्ट्राईक रेट ८६.६६ इतका खाली आला होता. यावेळी १५ चेंडूंत त्याने केवळ १३ धावा केल्या.

 

कोहलीने या सामन्यात ४१ चेंडूंत ५३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला.

 


ही वाचा:

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here