आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आज आम्ही या लेखात एका अनोख्या अश्या भारतातील एका गावाची खासियत आणि माहिती सांगणार आहोत की त्या गावात फक्त बाऊन्सर आहेत. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे.

बाऊन्सर
बाऊन्सर

बाऊन्सर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे धिप्पाट, ताकतवान असे लोक. बऱ्यापैकी अश्या प्रकारचे लोक आपल्याला सेक्युरिटी, सेलिब्रिटी बरोबर अंगरक्षक म्हणून असतात. तसेच बार आणि क्लब मध्ये अश्या प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात.

या लेखात आम्ही आशा गावाबद्दल सांगणार आहे की त्या गावातील प्रत्येक मुलगा हा बाऊन्सर च होतो. भारतातील दिल्ली मधील अशी दोन गावे आहेत त्या गावातून सर्वात जास्त बाऊन्सर आहेत.

दिल्ली मधील असोला आणि फतेहपुर बेरी  ही या दोन गावांची नावे आहेत. ही  दोन्ही गावे दिल्लीच्या दक्षिण भागात  स्थित आहेत. मागील १६ वर्षांपासून या गावांची ओळख  ही ‘बाउन्सर विलेज’ म्हणून सर्वत्र आहे तसेच ही दोन गावे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध सुद्धा आहे. बहुतांश या गावातील तरुण युवक हे बाऊन्सर चेच काम करत असतात.

Advertisement -

१६ वर्षांपूर्वी या गावातील एका तरुणाला म्हणजेच  विजय तन्वर या नावाच्या एका युवकाला ऑलम्पिकमध्ये जायचं होतं, पण काही कारणानं ते त्याला जमलं नाही यासाठी त्याने  बाउन्सरचं काम स्वीकारलं.  विजय हा या गावातील  पहिला बाउन्सर झाला होता.

त्यानंतर च्या काळात त्याने अन्य गावातील अन्य तरुणांना या कामासाठी मोठ्या प्रमाणात प्रेरित केलं. आता विजय ची एक स्वतःची  मोठी सिक्युरिटी कंपनी देखील आहे. आजपर्यंत या गावातील सुमारे  १००० पेक्षा ही जास्त युवक दिल्लीत  बाउन्सर चे काम करतायत.

बाउन्सर होयच असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच शरीर सौष्ठव आहे. आणि प्रत्येक बाऊन्सर साठी हेच खूप महत्वाचं आहे. यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणात मेहनत आणि व्यायाम  करावं लागतं. गावातील आखाड्यात होतं.

दररोज 2 तास व्यायाम आणि खास डायट हा बाऊन्सर साठी खूप आवश्यक असतो.  बाऊन्सर ला भल्या पहाटे उठून दंड बैठका मारणे, सूर्य नमस्कार, कुस्ती या प्रकारचे व्यायाम करावे लागत असतात आणि स्वतःला मजबूत बनवत असतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here