जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

=====

‘स्वातंत्र्य भिक मागूनच मिळाले’ अभिनेत्री कंगना राणावतला या मराठी अभिनेत्याने दिला पाठींबा, म्हणाला कंगना खर बोललेली..


बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने जेव्हापासून ‘स्वातंत्र्य भिक मागून मिळाले’ असे विधान केले आहे, तेव्हापासून ती चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्रीच्या विरोधात एक मोठा वर्ग समोर आला आहे,दरम्यान एका दिग्गज अभिनेत्याने कंगनाचे समर्थन केले आहे.

कंगनाच्या वक्तव्यावरून पेटलेला हा वाद आता आणखीनच चिघळण्याची शकयता आहे.

ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात गोखले म्हणाले की, रणौत जे बोलली ते खरे आहे. विक्रम गोखले म्हणाले, राणौत यांच्या विधानाशी मी सहमत आहे.

कंगना राणावत

अनेक स्वातंत्र्यसैनिकांना फाशी देण्यात आली आणि त्यावेळी मोठ्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ते फक्त मूक प्रेक्षक राहिले. या मूक प्रेक्षकांमध्ये अनेक ज्येष्ठ नेते होते. इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी वाचवले नाही. त्यामुळे मिळालेलं स्वतंत्र्य हे भिकेत मिळाल्या सारखच आहे.

Advertisement -

गोखले हे मराठी रंगभूमी, बॉलीवूड आणि टीव्हीवरील त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. ते म्हणाले की भारतीय जनता पक्षासह (भाजप) प्रत्येक राजकीय पक्ष वादात आपला फायदा पाहतो. त्रिपुरातील कथित जातीय हिंसाचार आणि त्याविरोधात अमरावती आणि इतर शहरांमध्ये उसळलेला गदारोळ या प्रश्नाला उत्तर देताना गोखले म्हणाले की, जातीय दंगली व्होट बँकेच्या राजकारणाचा परिणाम आहेत. ते म्हणाले, “प्रत्येक राजकीय पक्ष असे (व्होट बँकेचे राजकारण) करतो. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत गोखले म्हणाले की, देशाच्या भल्यासाठी माजी मित्रपक्ष- शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र आले पाहिजे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here