आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

वयाच्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापने ची शपथ घेतली. मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पाया रोवला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशभर 300 किल्ले जिंकेल होते. त्यातीलच एक म्हणजे भयानक शांतता आणि घनदाट जंगलात असलेला वासोटा किल्ला.

वासोटा हा किल्ला अतिशय भयंकर तसेच भयाण जंगलात वसलेला आणि किर्रर्र शांतता असलेला किल्ला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट जंगलामध्ये वासोटा हा किल्ला आहे. हा एक वनदुर्ग किल्ल्याचा प्रकार आहे. तसेच या किल्ल्याला  व्याघ्रगड या नावाने सुद्धा ओळखले जाते.

Advertisement -

तसेच वासोटा किल्ल्यावर पाण्याची टाकी आहे तसेच जुन्या पुरातन वाड्याचे अवशेष आणि शिवमंदिर आहे तसेच किल्ल्यावर  बाबुकडा नावाचा अजस्र असा कडा आहे. हा कडा पर्यटनाचे  सर्वांत मोठे आकर्षण आहे.

वासोटा
वासोटा

सातारा जिल्ह्यातील बामणोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव हा बोटीने पार करावा लागतो.

संपूर्ण किल्ला चढण्यासाठी आपल्याला खड्या चढाईने हा किल्ला चढावा लागतो. हा किल्ला चढण्यासाठी कमीत कमी  दोन तास लागतात. किल्ल्यावर चढायचा  संपूर्ण प्रवास घनदाट जंगलामधून करावा लागतो.

आजूबाजूने  वेढलेला आणि किर्रर शांतता असलेल्या किल्ल्यावर जाण्यासाठी भीती तर वाटतेच. तसेच गडावर चढताना अनेक वेगवेगळ्या वन्य प्राण्यांचे दर्शन सुद्धा घडत असते. शक्यतो हा किल्ला चढताना एखादा गाईड बरोबर असावं नाहीतर जंगलात चुकण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते.

दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. तसेच यातील बरेच तरुण हे ट्रेकिंग साठी येत असतात. या किल्ल्यावर आपल्याला बऱ्याच वन्य जाती सुद्धा पाहायला मिळतात.

निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग रम्य वातावरण अनुभवायचे असेल तर हा किल्ला प्रत्येकाने पहिलाच पाहिजे धरतीवर असणारा हा एक स्वर्ग च आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here