आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तुळशीला हात लावून बोला हे शब्द, सर्व ईच्छा होतील पूर्ण!


 

हिंदू धर्म शास्त्रामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे.आपण तुळशीची दररोज नित्यनेमाने पूजा करतो.तुळशीमाता ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.ज्या लोकांच्या घरी माता तुळशीची नियमित पूजा केली जाते त्यांच्या घरी माता लक्ष्मीचा सदैव वास असतो. तस पहिला गेल तर तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

ज्या लोकांच्या घरासमोरच्या अंगणात तुळसी असते त्यांच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करत नाही. तसेच त्या घरचे वातावरण नेहमी आनंदी आणि मनाला प्रसन्न करणारे असते.पौराणिक शास्त्रानुसार माता महालक्ष्मीची रोज पूजा केल्याने त्या घरामध्ये सुख ,शांती,वैभव, धन नांदू लागते.तुळसी

अंगणात तुळस असणे ही एक आरोग्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी उत्तम गोष्ट आहे.तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास एखाद्या माणसाला खोकला असेल तर तो लगेच बरा होतो.तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक घरी तुळशी असते.रोज सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा करून तिच्यासमोर दिवा लावला जातो.

नक्की कोणता आहे मंत्र जाणून घेऊया…
तर सुरवातीला आपल्याला इष्ट देवतांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुळशीपाशी जाऊन आपल्याला तिच्या समोर हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा पेटवयचा आहे आणि त्यानंतर तुळशीला पवित्र जल अर्पण करायचं आहे.

 

जर तुमच्याकडे गंगा जल असेल तर तुम्ही तेसुद्धा तुळशीला अर्पण करू शकता. यानंतर तुळशीला हळदी कुंकू वाहायचे आहे. यानंतर आपल्याला तुळशीभोती सात परिक्रमा करायचा आहेत. व नंतर तुळशीसमोर बसून आपल्याला या मंतरुच्चाराचा जप करायचा आहे.“महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धनी आदी व्याधी हरा नित्यम तुलसी त्वं नमोस्तुते..” हा मंत्र लक्षात ठेवून नेहमी पूजा करताना जपायचा आहे.

तुळसी

या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख ,समस्या ,जय काही अडचणी असतील त्या पूर्णपणे दूर होऊन जातील.आणि हा मंत्र जप करताना आपल्याला मनोभावे तुळशीला शरण जायचे आहे.

आणि ज्याकाही समस्या असतील त्या तुळशीमतेला सांगायच्या आहेत,अस केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. देवांना सुद्धा तुळशी खूप प्रिय असल्याने तुम्हाला विष्णू देव यांचाही आशीर्वाद लाभेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here