जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

हे घरगुती उपाय करा आणि घरातील डास, झुरळ आणि पाली नाहीशा करा.!


 

प्रत्येकाला वाटत की आपले घर नेहमी स्वच राहावं, त्यासाठी आपण रोज सकाळी आणि रात्री झाडू मारतो पण तरीही आपले घर स्वच्छ राहत नाही, तसेच रोज आपण घराची फरशी पुसतो कारण की आपल्या घरात जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे किटाणू असतात ते निघून जावेत.

आपले घर कितीही स्वच्छ असले तरी आपल्या घरात जे नको ते पाहुणे नेहमी येतात जसे की डास, मुंग्या, पाली आणि बरेच काही. आपल्या घरात नको ते पाहुणे येतात त्यांना घालवण्यासाठी आपण बाजारातून वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणतो आणि ती लावली की थोड्या स्वरूपात ते येन बंद पडत आणि थोड्या वेळाने पाहिले की पुन्हा त्यांची सुरवात झालेली असते.

उपाय

Advertisement -

आपण जी बाजारातून जी औषधे किंवा फवारे आणतो त्याचा परिणाम सुद्धा आपल्या आरोग्यावर होतो त्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने जे किटाणू आहेत ते सुद्धा मरून जातील आणि आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही, चला तर पाहूया.

१. मुंग्या –

आपल्या घरात जिथे मुंग्याची लाईन लागलेली असते तिथे तुम्ही थोडी थोडी हळद पसरवू शकता कारण हळद अस एक नैसर्गिक औषध आहे ज्याने आपल्या घरात झालेल्या मुंग्या नाहीशा होतात तसेच जिथे मुंग्यांचे बिळ असेल तिथे तुम्ही हळद टाकली तर मुंग्या पुढे जाणारच नाहीत. तसेच आपल्या घरात जर काकडी असेल ते ही मुग्यांना घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे कारण जर काकडी कडू असेल तर ते सुद्धा चांगले आहे. अजून एक सर्वात गुणकारी औषध म्हणजे लिंबाचा पाला त्याने सुद्धा मुंग्या नाहीशा होतात.

२. झुरळ –

झुरळ घालवण्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपाय म्हणजे साबणाचे पाणी, तुमच्या घरात जिथे झुरळ आहेत तिथे ते फवारा म्हणजे ती नष्ट होतील आणि घरात झुरळे सुद्धा होणार नाहीत. तसेच आपल्या कपाटात सुद्धा झुरळे होतात त्यासाठी आपण बोरिक ऍसिड, गव्हाचे पीठ आणि साखर यांचे मिश्रण घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून कपाटात ठेवा त्यामुळे झुरळ होणार नाहीत.उपाय

३. पाली –

आपल्या घरात जिथून पाली येतात तिथे तुम्ही घरात जो कांदा असतो त्या कांदयाचे काप तुम्ही त्या जागेवर ठेवा किंवा कांदयाचा रस करून त्या जागेवर फवारा त्याने तुमच्या घरात पाली येणार नाहीत.

४. डास आणि माशा –

साठवणीच्या पाण्यात माशा आणि डास होतात त्यामुळे त्याची व्यवस्था तुम्ही चांगल्या प्रकारे केली पाहिजे. डास आणि माशा घरात होण्यापासून टाळण्यासाठी तुम्ही आपल्या घरात जो कापूर असतो तो दिवसातून एकदा किंवा दोन वेळा जाळा त्यामुळे तुमच्या घरात डास किंवा माशा होणार नाही आणि कापूरमुळे घरात ऑक्सिजन सुद्धा वाढतो त्यामुळे तुम्ही हा उपाय करणे गरजेचे आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here