आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

दाढी वाढवायचीय, मग करा हे घरगुती उपाय!


फॅशन च्या युगात कोणता ट्रेंड येईल सांगता येत नाही, जशी की वेगवगेळ्या प्रकारची दाढी ठेवणे. आजकाल दाढी ठेवणे खूप मोठी फॅशन आली आहे जे की प्रत्येक कॉलेज चा मुलगा असो किंवा अनेक दुसरा कोणी दाढी ही ठेवलेली असते.

 दाढी

ज्या काळी दाढी ठेवणे म्हणजे प्रेमात धोका झाला असेल तर अनेक कोणती कारणे असून लोक नाव ठेवत असत तीच दाढी आज फॅशन ट्रेंड बनला आहे. आधीच काळ असा होता की त्यामध्ये टापटीप पद्धतीने राहणे वेळोवेळी क्लीन शेव करणे याला महत्व दिले जायचे पण अत्ता दाढीने मार्केट गाजवलं आहे. आधी दाढीला नाव ठेवायचे पण अत्ता त्याचे चांगले दिवस आले आहेत.

पण प्रॉब्लेम असा आहे की काही लोक अशी आहेत की त्यांना दाढीच नाही त्यांच्या वयाची 25 वर्ष झाली पण अजून तुळतुळीत आहेत, आणि त्यांच्या मागची पोर दाढी वाढवून मार्केट मध्ये हवा करत आहेत.

Advertisement -

मग दाढी वाढवण्यासाठी एक ऑइल आलं आहे त्याचा वापर मात्र होत आहे पण आम्ही आज अशा काही टिप्स देणार आहोत ज्या घरगुती असून फायदा सुद्धा आहे चला तर पाहूया.

१. नियमित व्यायाम करणे –

नियमित व्यायाम करणे ही गोष्ट आपल्या शरीरासाठी तर चांगली आहेच सोबत आपल्या दाढी वाढण्यासाठी सुद्धा चांगली आहे. आपल्या दाढीसाठी टेस्टटेरोन महत्वाचे असते आणि ते व्यायाम केल्याने बुस्ट होते त्यामुळे व्यायाम करणे गरजेचे आहे..

२. मसाज –

दाढी

आवळ्याच्या तेलाने आपली दाढीच्या जागेवर मसाज करा कारण मसाज केल्याने दाढीची केस वाढण्याचा मार्ग मोकळा होतो.

३. चेहरा साफ करणे –

मित्रांनो उन्हातून फिरुन आला की चेहरा धुणे गरजेचे आहे कारण चेहऱ्यावरील घाण सुद्धा दाढी खुंटवण्यास कारणीभूत ठरते, त्यामुळे नियमितपणे चेहरा धुणे गरजेचे आहे.

४. टेन्शन आणि झोप.

मित्रांनो टेन्शन हे सुद्धा दाढी न वाढण्याचे टेन्शन आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका तसेच नियमित आठ तास झोप घेणे आपल्यासाठी चांगले आहे आणि याच फायदा दाढीला होतो.

४. व्यसन –

व्यसनापासून दूर राहा त्यामध्ये सिगारेट पिणे आपल्या शरीरासाठी तर धोकादायक आहेच पण त्यातही आपली दाढीला ला धोकादायक आहे त्यामुळे हे व्यसन आणि इतर व्यसनापासून सुद्धा दूर रहा.

५. जास्तीत जास्त पाणी पिणे –

पाणी पिणे हे आपल्या शरीराला चांगले आहे, कमीतकमी दिवसातून साडे तीन ते चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे, याचा फायदा असा की तुमचे शरीर सुद्धा चांगले राहते आणि दाढी वाढण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होतो.

६. शॅम्पू लावणे –

काही लोकांचा समज आहे की शॅम्पू हा फक्त केसाला लावला जातो पण खरं सांगायला झाले तर शॅम्पू दाढीला सुद्धा उपयुक्त आहे कारण शॅम्पू लावल्यावर दाढीचे केस वाढायला चालू होतं.

७. बाहेरचे खाणे टाळणे –

आपण बरचे खाणे अगदी चवीने खातो, पण त्यामुळे आपली चरबी सुद्धा वाढते. आणि या बाहेरच्या खाण्यामुळे आपले दाढी वाढवण्याचे स्वप्न स्वप्नच राहते त्यामुळे त्वरित तुम्ही बाहेरचे खाणे टाळा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here