आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

राग आला असेल तर या टिप्स वापरा, मानसिक त्रास सुद्धा होईल कमी…!


जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही की तिला राग कधी येत नसेल, पण रागावर नियंत्रण ठेवणे हे अतिशय कमी व्यक्तीने येते तर काही लोकांना रागच आवरत नाही. तुम्हाला माहीतच आहे की रागात आपण कोणतीही गोष्ट करतो जसे की कोणासोबत वादविवाद होतात तर कोणाशी भांडणे होणे आणि त्यावेळी आपल्या मुखावाटे असे शब्द बाहेर पडतात की जवळची नाते तुटायला जास्त वेळ लागत नाही. रागामुळे आपल्याला मानसिक तसेच शारीरिक सुद्धा त्रास होतो त्यामुळे आपणाला राग शांत करणे आले पाहिजे, आज आम्ही तुम्हाला आपला राग शांत करण्याचे उपाय सांगणार आहोत.

१. आकडे मोजणे राग

तुम्हाला जर राग आला असेल तर त्यामध्ये तुम्ही एक ते शंभर पर्यंत सरळ किंवा उलटे आकडे मोजायला सुरुवात करा, हा सर्वात सोपा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला जास्त राग आला की हा उपाय करा.

२. दिर्घ श्वास घ्या 

Advertisement -

जेव्हा तुम्हाला जास्त राग येतो त्यावेळी तुमचा श्वास जास्त कमी होतो त्यावेळी तुम्ही दिर्घ श्वास घ्या, यामुळे सुद्धा तुमचा राग नियंत्रणात येईल.

३. मोकळ्या हवेत फिरा.

तुम्ही जर सकाळी, संध्याकाळी फिरायला जात असेल तर तुम्हाला राग येऊ शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला राग येत असेल तर बाहेर मोकळ्या हवेत जाऊन फिरा पण ती जागा शांत असावी. तुम्ही गाडीवर सुद्धा फिरू शकता पण जर जास्त राग आला असेल तर गाडी चालवणे टाळा नाहीतर तुम्हाला वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागेल.

४. स्नायू विश्रांती 

जेव्हा राग आला असेल त्यावेळी आपल्या स्नायूंना ताणा म्हणजे आपल्या शरीरातील स्नायूंना आराम द्या म्हणजे तुमचा ताण कमी होईल. जेव्हा तुम्ही स्नायू ताणता त्यावेळी श्वास घ्या श्वास सोडा त्यामुळे तुमच्या मेंदूवर कंट्रोल राहिल आणि मूड सुद्धा फ्रेश होईल.

५. मनोमनी वाक्य शोधा 

३ इडियट्स हा चित्रपट तुम्ही पहिला असेल त्यामध्ये एक वाक्य आहे ते म्हणजे ऑल इज वेल. हे एक उत्तम वाक्य आहे जे तुम्ही रागात मनोमनी म्हणू शकता आणि त्यामुळे सुद्धा तुमचा राग शांत होईल.

राग

६. गाणे ऐका 

तुम्ही शांत गाणी तसेच एखादे असे गाणे ज्याने तुमचा मूड फ्रेश होत असेल अशी गाणे ऐका त्यामुळे सुद्धा तुमचा राग नियंत्रणात येईल.

७. बोलणे थांबवा 

जेव्हा तुम्हाला राग आला असेल आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला काय बोलत असेल तर तुम्ही तिथून दुसरीकडे निघून जा, कारण तुम्ही जर वाईट शब्द बोलला तर तुमचे नाते तुटू शकते.

८. मोठ्याने हसा 

असे म्हणतात हसण्याने जीवन वाढते तसेच तुम्ही जर हसला तर तुमच्यामध्ये असे काही घटक असतात ते फ्रेश होतात त्यासाठी तुम्ही कॉमेडी विडिओ पहा त्यामुळे सुद्धा तुमचा राग शांत होईल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here