द फॅमिली मॅन टू चा कलाकारांचे मानधन माहित आहे का? मनोज वाजपेयी च्या फी चा आकडा ऐकून व्हाल थक्क!

 

सध्या सोशल मीडिया वरच काय तर सगळीकडेच द फॅमिली मॅन 2 ची जोरदार चर्चा आहे.

द फॅमिली मॅन 2

या सीरिजमधील  मनोज वाजपेयी, समंथा अक्किनेनी तसेच प्रियमनी यांच्या भूमिकांचे आणि सर्व कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाचे जोरदार कौतुक होत आहे.

द फॅमिली मॅन 2

Advertisement -

खरेतर समंथा अक्किनेनी च्या वाट्याला खूप कमी डायलॉग आलेले असले तरी तिने साकारलेल्या राजी या भूमिकेवर अक्षरशः चाहते फिदा झाले आहेत. कारण अतिशय दमदारपणे समंथा ने ही भुमिका साकारली आहे.

आता सहाजिकच आहे की सर्वांना या सीरिजमध्ये या कलाकारांनी किती फी घेतलेली आहे किंवा किती मानधन त्यांनी आकारलेले आहे याबद्दल उत्सुकता आहे. अर्थातच प्रोडक्शन हाऊस किंवा कलाकारांनी मानधनाच्या आकडयाबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही पण या आकड्यांची मात्र बी-टाऊनमध्ये जास्तच चर्चा आहे.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार द फॅमिली मॅन 2 साठी मनोज वाजपेयी यांनी सर्वाधिक पैसे घेतले आहेत. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीनी श्रीकांत तिवारी जी भूमिका साकारली आहे या भूमिकेसाठी त्यांनी दहा कोटी रुपये घेतले आहेत.

द फॅमिली मॅन 2

सीरिजमध्ये श्रीकांतच्या पत्नीची भूमिका साकारणारी सूची अर्थात सुचित्रा म्हणजेच प्रियामनी हिने या सीरिजसाठी ऐंशी लाख रुपये चार्ज केल्याचे वृत्त आहे.

साउथ ची सुपरस्टार समंथा अक्किनेनीने राजी या भूमिकेसाठी तीन ते चार कोटी रुपये फी घेतल्याचे कळते.

विशेष म्हणजे समंथाने फॅमिली मॅन टू या वेबसीरिज द्वारे ओटीवर हिंदी मध्ये पहिला डेब्यू केला आहे.

द फॅमिली मॅन 2

या सीरिजमध्ये जेके ची तंतोतंत भूमिका साकारणारा अभिनेता , शारीब हाश्मी यानेही प्रियामणि च्या खालोखाल 65 लाख रुपयांची फी घेतली आहे.

द फॅमिली मॅन 2

मराठमोळा अभिनेता शरद केळकर यांचीही द फॅमिली मॅन टू मध्ये महत्त्वाची भूमिका आहे या भूमिकेसाठी त्याने 1.6 कोटी रुपये फी घेतल्याचे कळते

इतर स्टार कास्ट मध्ये सनी हिंदू जाने आपल्या भूमिकेसाठी 60 लाख रुपये तर श्रीकांत तिवारी च्या मुलीची भूमिका साकारण्यासाठी अशलेशा ठाकूर नेही 50 लाख रुपये घेतल्याचे वृत्त आहे.

द फॅमिली मॅन 2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here