जगभरातील रंजक माहिती आणि ताज्या बातम्यांकरिता आमच्या  फेसबुक पेजला लाईक करा.

====

#ThankYouModijiChallenge ट्रेंडवर,पंतप्रधानांच्या पंपावरील फोटोला लोकांचे साष्टांग दंडवत..!


महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिरावल्या होत्या. पण आता हळूहळू इंधन दरवाढ होत असताना पाहायला मिळत आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच इंधन दरवाढीला वेग आल्याचं दिसून येत आहे. यावरून सरकारवर टीका होत आहे.

सामान्य लोकांमध्ये इंधन दरवाढीमुळे असंतोष पाहायला मिळत आहे. कारण आधीच लॉकडाऊन असताना रोजगाराचं अवघड झालं आहे. याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी एखादी मोहीम हाती घेतात तशाप्रकारे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे पेट्रोल पंपावर गेल्यावर तिथे मोदींच्या फ्लेक्सवरील फोटोला नमस्कार करत आहेत.

पंतप्रधान

#ThankYouModijiChallenge असं मोहीमेचं नाव आहे. पेट्रोल पंपावर गेल्यावर मोदींनी हात जोडून पाठीमागील बाजूने फोटे घेत ते फोटो झपाझप पोस्ट करू लागले आहेत. यामध्ये  लोकं वेगवेगळ्या पद्धती वापरताना दिसत आहेत.

दरम्यान, या फोटोंमध्ये महत्त्वाचं म्हणजे महिलांनीही सहभाग घेतला आहे. महिलाही बेधडकपणे पंपावर फोटो काढत आहे. शहारांमध्येच नाही तर ग्रामीण भागातील तरूणांचाही या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

Advertisement -

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here