जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

भारताच्या कसोटी संघाची धुरा या मराठमोळ्या फलंदाजाच्या खांद्यावर, न्यूझीलंडविरुद्ध कसोटी संघ झाला जाहीर…!


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माला दोन्ही कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे, तर अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल.

चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असेल. दुसऱ्या कसोटीसाठी कर्णधार विराट कोहली संघात परतणार आहे. काही काळापासून टीम इंडियाकडून सर्व फॉरमॅटमध्ये खेळत असलेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतलाही विश्रांती देण्यात आली असून जसप्रीत बुमराहही कसोटी संघाचा भाग नाही.

ऋद्धिमान साहाची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे, तर केएस भरतने बॅकअप यष्टीरक्षक म्हणून टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे. मोहम्मद शमीलाही कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. तर टी-20 मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर रवींद्र जडेजा कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात सामील होणार आहे.

कसोटी

Advertisement -

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया: अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास शरीरास होते हे मोठे नुकसान…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here