जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

=====

ताजमहाल फक्त प्रेमाचीच निशाणी म्हणून नाही तर या महत्वाच्या गोष्टीमुळेही प्रसिद्ध झालाय…!


प्रेमाची निशाणी असणाऱ्या ताजमहालचा वेगळा  असा एक इतिहास आहे. आजही अनेक लोक ताजमहाल फक्त एका  नवऱ्याने आपल्या बायकोच्या प्रेमाखातर बांधला असचं समजतात पण ताजमहाल त्यापेक्षाही वेगळा आहे.

सुंदर पांढरा संगमरवरी ताजमहाल शतकानुशतके साक्ष देत आहे की शहाजहानचे मुमताजवर किती प्रेम होते.आज हा ताजमहाल प्रेमाचे प्रतीक म्हणून अनेक रसिकांच्या प्रेमाचा साक्षीदार बनला आहे.

मुमताजवरील प्रेम व्यक्त करण्यास शाहजहान बादशहाने ताजमहाल बांधकामास सुरवात केली. प्रेमाखातीर आजपर्यंत असं काम कोणीही केले नवते.

काय आहे ताजमहालचा इतिहास?

ताजमहाल

Advertisement -

ताजमहाल ही शाहजहानची तिसरी पत्नी मुमताज महलची कबर आहे. मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहानने तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. असे म्हटले जाते की मुमताज महलने मृत्यूच्या वेळी मकबरा बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर शाहजहानने ताजमहाल बांधला.

ताजमहाल पांढऱ्या संगमरवरी बनलेला आहे. त्याच्या चार कोपऱ्यांवर चार मिनार आहेत. ही अद्भुत गोष्ट बनवण्यासाठी शाहजहानने बगदाद आणि तुर्कस्तानमधून कारागीर आणले होते. ताजमहाल बांधण्यासाठी बगदादहून एका कारागिराला पाचारण करण्यात आले होते जो दगडावर वक्र अक्षरे कोरू शकत होता असे मानले जाते.

त्याचप्रमाणे बुखारा शहरातून कारागीर बोलावण्यात आला, तो संगमरवरी दगडावर फुले कोरण्यात तरबेज होता. त्याच वेळी, इस्तंबूल, तुर्की येथे राहणाऱ्या कुशल कारागिरांना घुमट बांधण्यासाठी आणि मिनार बांधण्यासाठी समरकंदमधून कुशल कारागीरांना पाचारण करण्यात आले. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या कारागिरांनी ताजमहाल बांधला.

1630 मध्ये सुरू झालेल्या ताजमहालचे बांधकाम सुमारे 22 वर्षे चालले. ते तयार करण्यात सुमारे 20 हजार मजुरांनी योगदान दिले. यमुना नदीच्या काठावर पांढऱ्या दगडांनी बांधलेल्या अलौकिक सौंदर्याचे चित्र असलेल्या ‘ताजमहाल’ने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपला ठसा उमटवला आहे. प्रेमाची ही खूण पाहण्यासाठी दूरदेशातून हजारो पर्यटक येथे येतात.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here