आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

“जय भीम” चित्रपटाचा वाद संपता संपेना,वन्नियार समुदायने पाठवली नोटीस; सुपरस्टार सुरिया सह हे कलाकारही अडचणीत..!


सुपरस्टार सुरिया यांचा नवा चित्रपट “जय भीम” संबंधित वाद काही संपता संपत नाहीये. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासूनच एका प्रसंगावरून चित्रपटाबद्दल वाद निर्मित व्हायला सुरवात झाली. त्यांनतर आता आणखी एक वाद या चित्रपटाच्या टीमवर ओढावला आहे.

वन्नियार संगमचे राज्य अध्यक्ष अभिनेता पुथा अरुलमोझी यांनी सुरिया, ज्योतिका, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि ‘जय भीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांनी समाजाची माफी मागावी आणि त्यांनी बदनामीकारक म्हटलेली सर्व दृश्ये काढून टाकावीत, अशी मागणी केली आहे. यासोबतच आठवडाभरात पाच कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

जय भीम

अमेझॉन प्राइम व्हिडीओवर २ नोव्हेंबरला सुरियाचा जय भीम रिलीज झाला आहे या चित्रपटात इरुलर समुदायाची जमात आणि त्यांना कोठडीत कसे छळले गेले याचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटात हिंदी भाषिक लोक एका दृश्यामुळे त्रासले होते ज्यात प्रकाश राज एका माणसाला हिंदीत बोलल्याबद्दल थप्पड मारताना दाखवले आहेत.

पाठवलेल्या नोटीसमध्ये एका कॅलेंडरवर अग्नी कुंडम दिसत असलेल्या दृश्याचा उल्लेख आहे. वास्तविक अग्नि कुंडम हे वाण्यारांचे प्रतीक आहे. पाठवलेल्या नोटीसमध्ये,निर्मात्यांनी जाणूनबुजून कॅलेंडर ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच राजकन्नूला त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे पात्र हेतुपुरस्सर वन्नियार जातीचे असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Advertisement -

सुरियाने या सर्व प्रकारावर एक निवेदन जारी केले आहे की त्यांचा चित्रपट आणि त्यांचा कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. ज्यानंतर सुर्याच्या चाहत्यांनी जय भीमच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ट्विटरवर #WeStandWithSuriya ट्रेंड करण्यास सुरुवात केली.

५ कोटींची भरपाई मागितली गेली.

वन्नियार संगमने पाठवलेल्या नोटीसमध्ये चित्रपटातील दृश्ये हटवण्यासोबतच माफी मागावी आणि सात दिवसांच्या आत ५ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here