जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी आपल्या आगामी ‘तडप’ या चित्रपटाद्वारे डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. अहान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे आणी तारा सुतारिया सहकलाकार म्हणून दिसेल. मंगळवारी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये अहान डॅशिंग बाइकवर सिगारेट ओढताना दिसत आहे. सुनील शेट्टीचा चांगला मित्र अक्षय कुमारने चित्रपटाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत अक्षय कुमार यांनी लिहिले की, “अप्रतिम डॅशिंग लूक, अद्भुत आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या तडप चित्रपटासाठी खूप शुभेच्छा आणि प्रेम. ” मिलान लुथरिया दिग्दर्शित ही फिल्म अ‍ॅक्शन आणि साहसाने भरलेली एक प्रेमकथा आहे. हा चित्रपट वर्ष २०१८ मध्ये रिलीज झालेल्या तेलगू चित्रपट आरएक्स१०० चा रीमेक आहे.

आरएक्स१०० बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता आणि असे असल्याने या चित्रपटाला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळू शकेल असा विश्वास आहे. मूळ चित्रपटात कार्तिक आणि पायल राजपूतची जोडी होती व ‘तडप’ मध्ये अहान आणि तारा हे मुख्य भूमिकेत दिसतील. एका वर्षात अहानने आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतली असल्याचे दिसते.
मंगळवारी ‘तडप’चे पोस्टर रिलीज होताच अभिनेता अजय देवगण भावूक झाला. “हे भावनिक आहे.

अहान इतक्या लवकर मोठा झाला आहे!अहान शेट्टीच्या पहिल्या चित्रपटासाठी सुनिल शेट्टीला हार्दिक अभिनंदन,अजय देवगनने ट्विटरवर पोस्टर शेअर करताना लिहिले.तडपच्या पोस्टरने अभिषेक बच्चनला त्या वेळेची आठवण करून दिली जेव्हा अहान लहान होता आणि त्याच्याबरोबर फुटबॉल खेळायचा,त्याने अहानच्या येणाऱ्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक सेलिब्रेटींनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करून अभिनंदन केले.आता हे पाहणे महत्वाचे ठरेल कि अहानचा हा सुनील शेट्टी सारखा माचो लुक किती पसंत केला जाईल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here