जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

अंगात ताप असतांना सुद्धा ठोकलेलं हे शतक सुनील गावसकर यांचं पाहिलं आणि शेवटचं शतक ठरले..


भारतीय क्रिकेटमधील एक नवाजलेलं नाव म्हणजे सुनील गावसकर. सुनील गावसकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक महत्वाच्याविजयी खेळ्या करून आपल्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. परंतु सुनील गावस्कर यांच्या नावावर एक असाही विक्रम आहे जो कोणताही क्रिकेटर मोडण्याचा विचार सुद्धा करणार नाही.

सुनील गावसकर

31ऑकटोबर 1986ला नागपूरच्या विदर्भ स्टेडियम मध्ये रिलायन्स विश्व कप स्पर्धेचा भारत विरुद्ध न्युझिलंड सामना खेळला गेला होता. याआधी कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने सेमिफायनल मध्ये प्रवेश केला होता.

या सामन्यात न्युझिलंडच्या कर्णधाराने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अनुभवी भारतीय गोलंदाजासमोर न्युझिलंडच्या फलंदाजस मोठी खेळी खेळण्यास अपयश आले. त्यांनी 50 ओव्हर खेळून 9विकेट गमावत 211रन बनवले.

भारतीय गोलंदाजीमध्ये चेतन शर्माने केन रदरफोर्ड,विकेटकीपर इयान स्मिथ,आणि इवान चाटफिल्ड यांना तंबूचा रस्ता दाखवत आपली पहिली हड्रिक पूर्ण केली. ही जागतिक क्रिकेटमधील पहिली हाड्रिक होती ज्यात विकेट जाणारे तिन्हीही फलंदाज होते.

यानंतर भारतीय टीमची बॅटिंग सुरु झाली.

कृष्णामाचारी श्रीकांतसोबत लिटल मास्तर सुनील गावसकर अंगात ताप असताना सुद्धा खेळण्यास उतरले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ताबडतोब फलंदाजी करत 136 धावांची भागीदारी केली.
136धावानंतर श्रीकांतच्या रूपाने भारतास पहिला झटका बसला. त्याने 58 चेंडूत 9चौकर आणि 3 षटकारच्या मदतीने 75रन बनवले होते.

 

त्यानंतर गावसकर यांच्या सोबतील स्टायलिश फलंदाज मोहम्मद अजरुद्दीन आले. तिकडे अंगात ताप असताना सुद्धा गावसकर यांनी इयान चाटफिल्डला एका ओव्हर मध्ये 3षटकार आणि 1चौकर ठोकून 22 धावा काढल्या. या सामन्यात सुनील गावसकर यांनी फक्त 85 चेंडूमध्ये आपले शतक ठोकले होते. हे त्यावेळी सर्वांत कमी चेंडूत केले गेलेलं पहिले शतक होते.

 

सुनील गावसकर आणि मोहम्मद आजरुद्दीन यांच्या जोडीने 32.1 ओव्हरमध्ये हा सामना संपवला होता. हा सामना गावस्कर यांचा दुसरा शेवटचा सामना होता. त्यानंतर सेमीफायनलमध्ये भारत हारला आणि गवसकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

अनेक मोठ्या खेळी केलेल्या असूनसुद्धा आपल्या नावावर शतक नसल्याच त्यांना नेहमी दुःख व्हायचं. परंतु शेवटी निवृतीच्या एक सामन्याअगोदर अंगात ताप असताना मारलेलं हे शतक त्यांना आनंदाने निवृत्त होण्यास मदतदायी ठरले.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

मधुबालाची कधीच पूर्ण न होऊ शकलेली प्रेमकथा.!

प्रियंका चोप्राच्या निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल, बनवला हा नवा रेकॉर्ड…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here