जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

भारतातील या अनोख्या मंदिरात देवीला चपलांचा हार घातल्या जातो.


हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आपण जेव्हाही मंदिरात जातो तेव्हा हार आणि प्रसाद सोबत घेऊन जातो. देशाच्या विविध भागातील मंदिरात विविध प्रकारचा प्रसाद देवी देवतांस चढवला जातो. परंतु आपल्या भारतात एक असंही मंदिर आहे जेथे देवीस प्रसाद तरं चढवला जातो परंतु सोबत चपलांचा हर घातल्या जातो.

होय! पहिल्यांदा ऐकून विश्वास बसणार नाही परंतु हे अगदी सत्य आहे. आपल्याचं देशात हे मंदिर आहे जेथे देवीस चपलांचा हार घातल्या जातो. चला तरं जाणून घेऊया या मंदिराच्या इतर गोष्टीबद्दल.

देवी
करनाटकातील गूलबर्गा जिल्ह्यात लकम्मा देवीचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिरात दरवर्षी एक यात्रा भरवली जाते. या यात्रादरम्यान अनेक लोकं दूरवरून येथे येतात आणि देवीस चपलांचा हार अर्पण करतात. या यात्रेस मुख्य करून गोला गावच्या लोकांचा मोठा सहभाग असतो. या यात्रेला “फुटवियर फेस्टिवल” सुद्धा म्हटले जाते.

ज्या भक्तांच्या पायाला आणि गुढघ्याना दुखापत झाली आहे. असे लोक देवीला चपलांचा हार अर्पण करतात. येथील लोकांची अशी श्रद्धा आहे की,देवीला हार अर्पण केल्याने त्यांच्या पायातील दुखापत कायमची निघून जाते. मंदिराबद्दल असेही म्हटले जाते की या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा देवीकडून पूर्ण केली जाते.

Advertisement -

देवी
या देवीबद्दल खूप जुनी मान्यता आहे की,जर लकम्मा देवीला चपलांचा हार अर्पण केला गेला तरं देवी प्रसन्न होते आणि गावकऱ्यांची बुऱ्या शक्तीपासून रक्षा करते. असंही म्हटलं जाते की लोकांकडून अर्पण केलेल्या चपला देवी घालून रात्री गावाला पहारा देते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here