जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

वडिलांनी सांगितलेल्या या एका गोष्टीमुळे बनवारीलाल मित्तल यांनी करोडो रुपयांची कंपनी उभारलीय..


 

बनवारीलाल मित्तल जेव्हा शाळेमध्ये शिकत होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते,नेहमी गर्दीपासून दूर उभे रहा आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी ते काम कर जे सहसा कोणी करत नाही.

वडिलांचे शब्द 49 वर्ष वय पार करणाऱ्या मित्तल यांच्या यशाचे आधार बनले .त्यांनी वडिलांच्या या शब्दांपासून प्रेरणा घेऊन नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. जवळपास तीन दशके आधी खाली हात कलकत्त्याला आलेल्या बनवारी यांनी आपल्या मेहनतीने एक असे व्यावसायिक साम्राज्ये उभे केले ज्याची वार्षिक उलाढाल दोन हजार सतरा अठरा मध्ये 111 करोड रुपये राहिली.

बनवारीलाल मित्तल

साल 2014 मध्ये स्थापित यांची कंपनी सस्तासुंदर वेंचर्स लिमिटेड आज बीएसई आणि एनएसई मध्ये लिस्टेड आहे. सोबतच तिची सुरु झालेली सहायक कंपनी सस्तासुंदर हेल्थबडी लिमिटेड चा एक ई-फार्मेसी पोर्टल सस्तासुंदर डॉट कॉम सुध्दा आहे ते याच नावाने फार्मसीची चैन चालवतात.

जपानची प्रमुख औषध निर्माता कंपनी रोहतो ने याच वर्षी पाच मिलियन डॉलरची गुंतवणूक करून सस्तासुंदर हेल्थ बॉडी चे 13 टक्के शेअर खरेदी केले . सस्तासुंदर ची स्वतःची औषध निर्माण कंपनी आहे जी पश्चिम बंगाल मधील बारावी पूर मध्ये स्थित आहे. साल 2014 मध्ये 120 स्टाप मेंबर्स सोबत सुरू झालेल्या फार्मसी मध्ये आज जवळपास 550 कर्मचारी आहेत. सोबतच या प्रदेशांमध्ये यांची 192 औटलेट्स आहेत. जे डायरेक्ट ग्राहकांच्या औषधांची ऑर्डर स्वीकारतात.

राजस्थान मधील सिकर जिल्ह्यातील दांता गावामध्ये 1 जुलै 1968 ला जन्मलेले बनवारीलाल सहा बहीण भावा मध्ये पाचव्या नंबरचे आहेत. यांचे वडील स्वर्गीय सावरलाल मित्तल यांचे कोलकातामध्ये कपड्यांचे छोटेसे दुकान होते.
बनवारीलाल सांगतात मी एका मध्यम वर्गीय परिवारामध्ये वाढलो. राज्यस्थान मध्ये उत्पन्नाचे सीमित साधन असल्यामुळे इतर लोकांप्रमाणे माझे वडील सुद्धा जास्त काळ कोलकता मध्येच राहिले . आमचं पालन पोषण करण्याची जिम्मेदारी माझ्या आईवर होती.

बनवारीलाल यांनी 1988 मध्ये दांता च्या सरकारी शाळेमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्याच्या पुढील वर्षीच ते आपल्या वडीलांकडे कोलकता येथे राहायला आले.

कोलकाता पासून तीस किलोमीटर दूर बाराईपूर च्या सस्तासुंदर कारखान्यामध्ये बनवारीलाल सांगतात , त्यावेळी आमच्या जिल्ह्यामध्ये पुढील शिक्षणासाठी कोणते चांगले कॉलेज नव्हते . यामुळे हायर सेकंडरी पूर्ण केल्यानंतर मी कोलकाता येथे जाण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा कोलकत्ता ला आलो तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांन सांगितले मी इथून पुढे तुझ्या शिक्षणाचा खर्च उचलणार नाही . तुला स्वतः सगळ्या गरजा पूर्ण कराव्या लागतील.

सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला, त्यांचे वडील म्हणाले गर्दीमध्ये उभे राहून सगळ्यात प्रमाणे काम करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण कर.वडिलांच्या या सल्ल्यामुळे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मित्रांपेक्षा काही वेगळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

साल1989 मध्ये त्यांनी उमेश चन्द्र कॉलेजमध्ये कॉमर्स चा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. यासोबतच त्यांनी चार्टर्ड अकाऊंट चा अभ्यास सुरू केला.

बनवारीलाल सांगतात मी माझ्या वडिलान सोबत बुरा बाजार च्या भागात 200 वर्ग मीटर रूम मध्ये राहत होतो. वडिलांनी मला सोबत राहण्याची अनुमती तर दिली पण माझा खर्च मलाच भागवायचा होता. मी एका खाजगी कंपनीमध्ये टायपिस्ट म्हणून पार्टटाइम काम करण्यास सुरुवात केली.

बनवारीलाल महिन्याचे 1800 रुपये कमावत होते यामध्ये त्यांचा खर्च भागत असे. साल 1992 मध्ये ते चार हजार रुपये प्रति महिना पगारावर कर आणि वित्त प्रबंधक या पदावर बिर्ला समूहामध्ये नोकरी करू लागले. तिथे त्यांनी आठ वर्षे काम केले. नोकरी सोडते वेळी त्यांची पगार 25 हजार रुपये प्रति महिना झाली होती.

कशातच साल 1996 मध्ये कोलकातामधील आभा मित्तल सोबत त्यांचे लग्न झाले. दोन मुली आणि एक मुलगा अशी एकूण त्यांची तीन अपत्ये आहेत. साल 2000 मध्ये नोकरी सोडल्यानंतर त्यांनी सीए म्हणून दोन वर्ष काम केले. याच काळात त्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी योजनासुद्धा बनवली.

 

 बनवारीलाल मित्तल

त्यांना वित्तीय सुविधांबाबत कसलीही माहिती नव्हती. यामुळे त्यांनी साल 2002 मध्ये मायक्रोसेक फायनान्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाने आपली वित्त कंपनी सुरू केली. जी स्टॉक ब्रेकिंग, मर्चंट बॅंकिंग आणि वित्तीय सल्ला देण्याचे काम करत होती. यामध्ये एकूण 2.5 करोडो रुपयांची गुंतवणूक केली गेली . बनवारीलाल सांगतात , त्या वेळेपर्यंत मी ऐंशी लाख रुपये जमा केले होते. बाकी पैसे मी माझ्या मित्राकडून पंधरा टक्के व्याजदरावर घेतले होते.

त्यांनी दक्षिण कोलकत्ता ची कॅमक स्ट्रीट जवळपास साठ लाख रुपयांमध्ये विकत घेतली होती. तेथील 2500 वर्ग मीटर कार्यालयांमधुन तीन कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी कामाला सुरुवात केली.पुढील तीन वर्षात 2005 मध्ये दक्षिण कोलकाता मधील बालीगंज मध्ये 10000 वर्ग फुट चा कार्यालयामध्ये रूपांतरित झाले. ज्याला त्यांनी 3.5 करोड रुपयांमध्ये खरेदी केली होते.

बनवारीलाल स्पष्टपणे सांगतात आमचा कारभार वाढत होता आणि साल 2010 मध्ये आम्ही जवळपास 45 करोड रुपयांचा कारभार केला. इथून पुढे आम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला. काल 2011 मध्ये चर्चा घोटाळा पुढे आला . त्यांचे जास्त ग्राहक हे व्यावसायिक होते. त्यांचा मुख्य व्यवसाय कोळसा वर अवलंबून होता. घोटाळा याचा खुलासा झाल्यानंतर त्यांनी खूप सारे ग्राहक गमावले आणि त्यांचा कारभार अडचणीत आला.

बनवारीलाल यांना आपल्या व्यापाराविषयी नवीन सुरुवातीचा विचार करावा लागला . त्यांनी नवीन व्यावसायिक मार्ग शोधण्यासाठी सुट्टी घेतली आणि युरोपला गेले. तिथे फार्मसी आणि त्याची वितरण प्रणाली याबाबत त्यांचे ध्यान आकर्षित झाले. ते सांगतात मी विश्व स्वास्थ संघटन आणि अन्य प्रतिष्ठित स्वास्थ एजन्सी यांच्या रिपोर्ट बघितल्या . यामधून त्यांना कळाली की कशा प्रकारे आपल्या देशामध्ये नकली औषध उपचारांद्वारे सामान्य जनतेला ठगल्या जाते.

त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की आपल्या वितरण प्रणाली मध्ये दोष आहे. चांगल्या गुणवत्तेची औषधे डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे. यानंतर त्यांनी औषध वितरण प्रणाली वर व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
वडिलांनी दिलेली शिकवण पुन्हा एकदा त्यांना आठवली. बनवारीलाल सांगतात, ऑनलाइन फार्मसी ही गोष्ट भारतासाठी एक नवीनच होती.

याद्वारे मी गर्दीपासून वेगळे उभा राहू शकत होते.

14 जानेवारी 2014 ला रविकांत शर्मा सोबत मिळून त्यांनी जवळपास 150 करोड रुपये ची गुंतवणुक करून एक ही फार्मसी सस्तासुंदर कंपनी स्थापन केली.

बनवारीलाल मित्तल

यामुळे व्यवसायासाठी शहराच्या बाहेर राजारहाटच्या परिसरामध्ये त्यांनी 15 गुंठे जमीन जवळपास चाळीस लाख रुपयांना विकत घेतली. बनवारीलाल सांगतात मी माझ्या कंपनी मधून झालेली सगळी कमाई यामध्येच लावली. मला पूर्ण विश्वास होता की व्यापाराची ही योजना भारतामध्ये चालेल.

त्यांचा विश्वास खरा ठरला आणि फार्मसीच्या व्यवसायाने गती पकडली. साल 2015 मध्ये त्यांनी जवळपास 20 करोड रुपयांपेक्षा जास्त कारभार केला. हा आकडा 2016 मध्ये वाढून 63 करोड रुपयांपर्यंत पोहोचला.

त्यांची कंपनी लवकरच दिल्ली आणि देशातील इतर शहरांमध्ये सेवा पुरवण्याची योजना बनवत होती. बनवारीलाल यांचे उद्दिष्ट येणाऱ्या पाच वर्षांमध्ये सस्तासुंदर कंपनीला सहा हजार करोड रुपयांचा कारभार करणारी कंपनी बनवण्याच्या आहे.

बनवारीलाल आज युवा पिढीला सल्ला देतात , खूप मेहनत करा , आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि इतरांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here