आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सुमारे १९ व्या शतकातील ही गोष्ट आहे जी आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहे, जे की तुम्हाला हे माहीत आहे की ज्यावेळी आपल्याकडे कोणतीही गोष्ट चिटकवण्यासाठी सेलो टेप, चिकटपट्टी अशा विविध प्रकारच्या गोष्टी न्हवत्या त्यावेळी आपण विविध प्रकारचे झाडाचे डिंक वापरायचो आणि चिटकवायचो. पण हे अनुभवलं आहे.

ते मात्र १९ व्या शतकातील लोकांनी. कारण त्यावेळी जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सर्वच लोक गम आणि डिंक चा वापर करत होते पण अचानक टेप हातात आला आणि तो वापरायला सुद्धा एकदम सोपा आणि व्यवस्थीत त्यावेळी त्या लोकांचा आनंद काही निराळाच होता जो अत्ताच्या मुलांना नाही समजणार. चला तर पाहू मग नक्की कोण आहेत ते महाशय ज्यांनी याचा शोध लावला.

रिचर्ड ड्र्यूचा चा जन्म २२ जून १८९९ साली झाला, अगदी चांगल्या प्रकारे शाळा शिकून त्याने पुढे अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला, पण त्यावेळी तो कॉलेज च्या डान्स हॉल मध्ये बँड वाजवायचा कारण त्याला त्यातून पुरेसे पैसे भेटायचे.

चिकटपट्टी व्यवसाय
चिकटपट्टी व्यवसाय

कॉलेज चे शिक्षण सुद्धा त्याने दीड वर्षातच सोडून दिले आणि ते फक्त पैशामुळे. पुढे त्यांनी एक डिझायनिंग चा कोर्स केला आणि 3M या कंपनीत नोकरी मिळवली. लॅब टेक्निशियन म्हणून ते काम करत होती, त्यावेळी ती कंपनी एक सँड पेपर तयार करत होती.

एकदा असे घडले की रिचर्ड ला सेंड पेपर ची नव्या बॅच ची चाचणी घ्यायची होती, त्यावेळी जेव्हा ते त्या ठिकाणी गेले तिथे कामगारांच्या असे समजले गेले की तिथे ज्या मोटारी आहेत तिथे जो टेप वापरला जातोय तो काढताना तो कलर सुद्धा निघून येतोय आणि त्यामुळे त्यांचे काम डबल वाढतय आणि जास्त खर्च पण जायचा आणि हेच रिचर्ड ने ऐकले आणि त्याला काहीतरी वेगळ करायला पाहिजे असं वाटलं.

तिथून पुढे त्याने टेप कसा बनवता येईल यावरती काम चालू केले, अगदी तो विविध झाडे सुद्धा पाहत होता त्याचा प्रयोग सुद्धा करत होता त्यावेळी 3M कंपनीचे मालक यांनी त्यांना हे न करता त्यांनी कामावर लक्ष द्यावे असे सांगितले पण रिचर्ड ने वेळात वेळ काढून प्रयोग चालू ठेवला अखेर 1925 मध्ये त्यांना एक टेप तयार झाला पण तो फारसा वेळ चिटकत न्हवता.

पण त्यांनी हार न मानता काम चालूच ठेवले आणि शेवटी 1930 ला हे काम पूर्ण झाले आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. सुमारे आजच्या काळात 3M कंपनीचा व्यवसाय 3200 कोटी कडे गेला आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here