आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सोनपरी मालिकेतील फ्रुटी आज करतेय मराठी इंडस्ट्रीवर राज्य,फोटो बघून घायाळ व्हाल


तुम्हाला आठवतंय का सुमारे २० वर्षांपूर्वी म्हणजे साल २००० -२००४ मध्ये स्टार प्लस या चॅनेल वर एक मालिका लागायची त्या मालिकेचे नाव सोनपरी. त्या मालिकेत एक परीचे पात्र होते जे मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केली होती.

त्यावेळी ती मालिका पाहून बहुदा आपल्याला असे वाटायचे की आपल्याला पण अशी एक परी भेटावी म्हणजे आपण नवीन नवीन वस्तू तिच्याकडे मागून घेऊ. तसेच त्या मालिकेत एक फ्रुटीची भूमिका होती ती सुद्धा अगदी तुफानात गाजली हाती, त्यावेळीची फ्रुटी आणि आत्ताची जी फ्रुटी यामध्ये खूप फरक आहे. जसे की अत्ता त्या फ्रुटीचे वय ३१ वर्ष झाले आहे आणि सर्वात म्हणजेच मराठी चित्रपट इंडस्ट्री मध्ये तिचे नाव खूप गाजले आहे. आज आपण तिच्याबद्धल जाणून घेणार आहोत कारण खुप लोकांना तिच्याबद्धल माहिती नाही.

सोनपरी

तन्वी हेगडे म्हणजे त्या मालिकेतील फ्रुटी. अगदी चार वर्षे चांगली भूमिका साकारून तिने तरुणांच्या मनावर आपली छाप टाकली होती.

Advertisement -

त्यावेळी लहान मुलांची आवडती मालिका कोणती तर ती सोनपरी, आजकाल आपण पाहत आहो की अशा मालिका नाहीतच ज्याने लहान मुलांचे मनोरंजन होईल. पण मालिका संपल्यापासून तन्वी कुठे गेली आणि अत्ता सध्या काय करते ही खंत अनेक लोकांच्या मनात आहे आणि ती खंत आज आम्ही दूर करणार आहे.

तन्वीचा जन्म ११ नोव्हेंबर १९९१ साली मुंबई मध्ये झाला, फक्त वयाच्या 3तिसऱ्या वर्षी तिने एका काँटेस्ट मध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून तिला कला क्षेत्रात आवड निर्माण झाली. तन्वीने फक्त सोनपरी नाहीतर “शका लका बुम बुम ” मध्ये सुद्धा काम केले आहे. या मालिकेमुळे तिला सर्व लोक ओळखू लागले.

सोनपरी

तन्वीने जवळपास दीडशे पेक्षा अधिक जाहिराती मध्ये काम केले आहे तसेच विरुद्ध, गजगामीनी, लाईफ हो तो ऐसी अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात सुद्धा काम केले आहे. त्यानंतर तिने आपली दिशा मराठी चित्रपटांनकडे ओळवली.

जसे की २०१६ साली आलेला मराठी चित्रपट “धुरंधर भाटवडेकर” या चित्रपटात सुद्धा काम केले, तसेच “अथांग, हक्क अशा चित्रपटात सुद्धा तिने चांगली भूमिका केली. एकदा तन्वीच्या आईची मुलाखत घेतली तेव्हा तिने सांगितले की मला खूप अभिमान वाटतो की तन्वी मराठी चित्रपटात चांगले काम करत आहे, अगदी लहान वयापासून ते अत्ता पर्यंत चा तिचा प्रवास खुप चांगला लाभला आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here