जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जखमी अन् अनाथ प्राण्यांसाठी ‘सोनवणे’ दाम्पत्याने उभे केले वन्यप्राण्यांचे अनाथालय…!


जंगलात फिरणारे वन्यजीव प्राणी शिकारीमुळे अथवा पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येताना अचानक अपघात होऊन ते जखमी झाले आणि त्यांना योग्य उपचार मिळाला नाही तर परिणामी त्यांना जीव गमवावा लागतो. या मुक्या प्राण्यांच्या वेदना जाणून घेत त्यांचा जीव वाचावा म्हणून एका दाम्पत्याने वन्यजीवांचे अनाथालय उभा केले आहे. या दाम्पत्यांने आजवर तब्बल १८ हजारांपेक्षा अधिक वन्यजीवांची देखभाल केली आहे. लांडगा, तरस, साप, वानर, घुबड यासारख्या सर्व प्राण्यांवर योग्य उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले अाहेत.

ही कहाणी आहे बीड जिल्ह्याच्या शिरुर कासार तालुक्यातील तागडगाव इथल्या सृष्टी सोनवणे आणि सिद्धार्थ सोनवणे या दाम्पत्याची. आपल्या घरी पाल जरी दिसली तर पळता भुई थोडी होते.

इथं मात्र या दाम्पत्याने ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रा’ च्या माध्यमातून तब्बल १८ हजारहून अधिक जखमी वन्य जीवांवर उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात सुखरुप सोडले आहे. वास्तविक पाहता सिद्धार्थ आणि सृष्टी हे बालमित्र. दोघेही निसर्गप्रेमी. सर्पमित्र असलेल्या सिद्धार्थने वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड सेक्युअरी असोसिएशन २००१ मध्ये स्थापना केली. यामार्फत ते वन्यजीवांची सेवा करू लागले.

सोनवणे

Advertisement -

पुढे सिद्धार्थ आणि सृष्टीच्या मैत्रीचे रूपांतर हे लग्नात झाले. त्या दोघांनी लग्नही आगळ्यावेगळ्या पध्दतीने केले. लग्नात हार घालण्याऐवजी एकमेकांच्या गळ्यात साप आणि अक्षता म्हणून झाडांच्या बिया टाकण्यात आल्या. पुढे दोघेही वन्यजीवांच्या संरक्षणासाठी झटू लागले. सिद्धार्थ जखमी प्राणी शोधून अाणत आणि सृष्टी त्यांच्यावर योग्य उपचार करतात.

सृष्टी स्वतः एक सर्पमित्र आहेत. म्हणून त्यांना साप, सरडे, पाली यांच्याबद्दल सर्व माहिती आहे. पण त्याबद्दल समाजात गैरसमज आणि अंधश्रद्धा असतात. त्या अंधश्रद्धा दूर करण्याचे कामही त्या करतात. यातून वन्यजीव पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची संकल्पना सुचली.

मुलगी सर्पराज्ञी हिच्या जन्मदिनी २०१२ मध्ये ११ एकराच्या माळरानावर हे केंद्र सुरू झाले. अाज जस्त्र अजगर, आईपासून दूरावलेल्या हरणाचे पाडस, देवीच्या रोगाने अंध झालेला मोर जखमी कोल्हा, वानर, घुबड, तरस व लांडगा यासारखे प्राणी आज त्या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदतात.

या प्राण्यांवर उपचार करून त्यांच्या निवासस्थानी सोडल्यानंतरही ते पुन्हा प्रकल्पावरून कडे येतात. यावरून या मुक्या जिवांना माणसांचा किती लळा लागला आहे, हे यावरून लक्षात येते. या केंद्राला शासकीय मान्यता असली तरी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. सहा एकर शेतीच्या उत्पन्नातून सर्व खर्च भागवतात.

जखमी प्राण्यांचे माहेरघर

‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र’ हे जखमी प्राण्यांचे माहेरघर बनले आहे. या केंद्रात आणल्या जाणाऱ्या प्रत्येक प्राण्यांची नोंद वनविभागाकडे करण्यात येते. वनविभाग आणि पशू वैद्यकीय अधिकारी हे या दाम्पत्याची धडपड पाहून प्राण्यांवर उपचार करतात. प्राण्यांना छोटी दुखापत झाली असेल तर त्यांच्यावर या केंद्रातच उपचार केले जातात. मोठ्या जखमांसाठी मात्र बीड, शिरुर इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन तज्ज्ञांकडून उपचार करून घेतले जातात. त्यानंतर त्यांना पुनर्वसन केंद्रात पूर्णपणे बरे होईपर्यंत ठेवले जाते. पूर्ण उपचारानंतर त्यांना पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडले जाते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here