आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मातीच्या भांड्यांचे हे महत्व तुम्हाला माहिती आहे का?


काळानुसार आपल्यात बदल हवा पाहिले हे मात्र खरं आहे पण एवढा बदल की आपले आरोग्य सुद्धा आपण कुठेरी गमावत चाललो आहे, जसे की आपले राहणीमान बदलले आहे तसेच आपल्या सवयीसिद्ध बदलल्या आहेत. फक्त राहणीमान म्हणता येणार नाही तर पूर्ण जीवनशैली च आपण बदलून टाकली आहे.

मातीच्या भांड्याचे महत्व
मातीच्या भांड्याचे महत्व

आपण किचन मध्ये पाहिले तर पूर्वीच्या काळी मातीची भांडी असायची जे की आपल्या आरोग्यासाठी खुप चांगली असायची पण अत्ता किचन मध्ये पाहिले तर आपण नॉनस्टिक ची भांडी वापरून आपले आरोग्य कुठेतरी बिघडवत चाललो आहे. काही काळापासून हे पाहायला भेटत आहे की मागील काळात जो मातीची भांडी दिसत होती.

तीच भांडी आजकाल वापरायला सुरू झाले असून मानवाने कुठेतरी आपले आरोग्य चांगले ठेवण्याचा विचार केला आहे. आज आपण हेच पाहणार आहोत की मातीची भांडी आपल्या आरोग्यासाठी किती चांगली आहेत.

१. अन्न चांगले शिजते –

Advertisement -

आपले आरोग्य जपण्यासाठी अन्न चांगले शिजले पाहिजे पण आजच्या भांड्यात अन्न खूप वेगाने शिजते पण मातीच्या भांड्यात अन्न हळुवार पद्धतीने शिजते तसेच ते अन्न खूप पौष्टिक असते आणि आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो.

२. मातीच्या भांड्यातील पोषक द्रव्ये –

मातीच्या भांड्यात जे अन्न शिजवले जाते त्यामध्ये आपल्याला जी पोषक द्रव्ये भेटतात ते आपल्या शरीरासाठी चांगली असतात, जसे की त्या भांड्यातील अन्न मधून कॅल्शियम, सल्फर, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम इ. प्रकारचे पोषक घटक आपल्याला भेटतात.

३. कमी तेल –

मातीच्या भांड्यात जे अन्न शिजवले जाते त्यासाठी तेल कमी लागते, अगदी कमी तेलात स्वयंपाक होतो आणि त्यामुळे आपल्याला चरबी वाढण्यापासून तसेच पित्तापासून बचाव होतो.

४. किमंत –

अल्युमिनियम किंवा जो नॉनस्टिक ची भांडी असतात त्याच्या किमतीपेक्षा कमी दरात मातीची भांडी आपल्याला भेटतात जसे की कुकर, तवा, कढई.

५. पर्यावरनास पूरक –

मातीची भांड्यामुळे निसर्गाला कोणतेच नुकसान पोहचत नाही तसेच जर ही भांडी खराब झाली तर आपण अगदी सोप्या पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावू शकतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here