जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सोलापूरची ‘संतोषीमाता’ गोशाळा गोवऱ्या तयार करून रशिया,जर्मनी, अमेरिकेत पाठवताहेत..!

वर्षानुवर्षे गायीचा सांभाळ, वैरणाचा वाढीव खर्च, अत्यल्प अनुदानामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांची परवड होत आहे. या परिस्थितीमध्ये दूध न देणाऱ्या भाकड गायींचा सांभाळ कसा करायचा, या जनावरांचे काय करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे कायम असतो. शेतकर्‍यांसाठी निरुपयोगी असणार्‍या भाकड देशी गायीचे जतन व संवर्धन करण्यासाठी १४ वर्षापूर्वी गोशाळा सुरू केली. याच गोशाळेत गायीच्या शेणापासून तयार होणार्‍या
दरवर्षी लाखो गोवऱ्या परदेशात जात आहेत.

डॉ. राजेंद्र गाजूल यांनी शहरातील विडी घरकूल परिसरातील, महालक्ष्मी नगर येथे ५ भाकड गाईपासून संतोषीमाता गोशाळा सुरु केली. आज या गोशाळेत १०० भाकड गाई सुखाने नांदत आहेत. देशी गाईचे जतन व्हावे, या हेतूने ही गोशाळा उभी केली. मात्र उतार वयातल्या या गायींचा खर्चाचा भार हा अधिक होता. गोशाळा चालवण्यासाठी यातून काहीतरी उत्पन्न मिळावे यासाठी गोवऱ्या तयार करण्यास सुरू झाली. याचदरम्यान वर्धा येथे देशी गाई विषयक कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत गाजुल यांना भाकड गायींचे देशी गाईंचे महत्त्व आणि फायदे समजले. या कार्यशाळेने श्री. गाजुल यांचा दृष्टिकोन बदलून टाकला.

गोशाळेतून उत्पन्न कसे मिळेल याचा त्यांनी विचार करून तशी रचना आखली. गोशाळेत मुक्तसंचार पध्दतीचा प्रशस्त गोठा बांधला. गायींसाठी मुबलक चारा पाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या देखभालीसाठी सात माणसे कामास लावली. गोशाळेत गोवऱ्या तयार करण्यास सुरुवात केली. गोशाळेत तयार केलेत आलेल्या गोलगोल आकाराच्या आकर्षक गोवऱ्या या स्थानिक बाजारपेठेत नफा ना तोटा या तत्त्वावर विक्रीस ठेवण्यात आल्या. देशी गायींपासून तयार केलेल्या या गोऱ्यांना बाजारपेठेत चांगली मागणी येऊ लागली. पुढे या गोवर्‍या सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. येथील गोवऱ्या रशिया, जर्मनी, अमेरिका, मलेशिया या देशात जात अाहेत.

गोवऱ्या

Advertisement -

दरवर्षी दीड लाखाहून अधिक गोवऱ्याची निर्यात केली जाते. परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिक पूजा अाणि हवनासाठी गोऱ्यांना मागणी करत अाहे. सहा इंच, पाच इंच, चार इंचच्या गोल गोल आणि बिस्कीट अाकाराच्या गोवर्‍या येथे तयार केल्या जातात. गोवऱ्या तयार केल्यानंतर २५ गोवऱ्यांचा एक नग अशी सहा पाकिटे बॉक्समध्ये पॅक करून पाठवली जातात. यातून चांगले उत्पन्न गोशाळेस मिळू लागले. विदेशासह देशातही म्हणजेच मुंबई, बेंगलोर, दिल्ली या ठिकाणांहून या गोवर्‍यांना मागणी आहे. या गोशाळेत उपाध्यक्ष नागनाथ पोर॑डला यांनी संपूर्ण देखभाल करतात.

 

मिळणाऱ्या उत्पन्नातून गोशाळेचा खर्च भागवला जातो

गोवऱ्यांच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून गोशाळेचा खर्च भागवला जातो. गोशाळेत गायीच्या शेणापासून गोमय भस्म, धूपकांडी, दंतमंजन, फेसपॅक, मच्छर अगरबत्ती, गोमूत्रापासून अर्क व घनवटी यासारखे वस्तू तयार केल्या जातात. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गोमुत्रापासून गौफिनाईल, जीवाअमॄत तयार करून देतात. एकंदरीतच या गोशाळेने भाकड गाईंबद्दल चा दृष्टिकोन बदलला. शिवाय देशी गाईच्या जातीचे संवर्धन करण्यालाही हातभार लावला. यासह स्थानिक कामगारांना ही चांगला रोजगार निर्माण करून दिला आहे.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here