आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

इंजिनीअर भावंडांनी बनवली ‘ई सायकल’, लॉकडाऊनकाळतील नवनिर्मिती!


सोशल मीडियाच्या जमान्यात अाजचे विद्यार्थी मोबाइलच्या माध्यमातून आधुनिक पध्दतीने स्मार्ट शिक्षण घेताहेत तर दुसरीकडे एक मुलगी हातात वीणा घेऊन कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाच्या चार गोष्टी सांगत आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने कीर्तनातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या मधुर अशा वाणीतून ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील अभंगावर तिचे विवेचन लोकांना भावत अाहे. राजश्री राजाराम ढवळे असं या बाल कीर्तनकारांचे नाव आहे.

उस्मानाबाद शहरातील बालाजी नगर परिसरात राहणार्‍या राजश्रीला बालपणापासून भजन-कीर्तनाची आवड. राजश्री ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी. तिचे वडील भाजी मंडईमध्ये भाजी विकतात तर आई सुवर्णा या साडी विक्रीचा व्यवसाय करते. तिचा भाऊ आदित्य हा भजन-किर्तनामध्ये तबला आणि मृदुंग उत्तमरीत्या वाजवतो. वास्तविक पाहता राजश्रीच्या घरी अगदी भक्तिमय वातावरण अाहे. तिच्या आजोबांमुळे बालपणी ती वारकरी संप्रदायात रमून गेली. संत तुकाराम, संत नामदेव, जनाबाई आदी संतांचे ३०० हून अधिक अभंग, ज्ञानेश्वरीतील ओव्या, गवळणी हे तिला तोंडपाठ आहेत.

ई सायकल

राजश्रीने वयाच्या आठव्या वर्षी हरिपाठ म्हणण्यास सुरुवात केली. हरिपाठ सादर करत असतानाचा व्हिडिओ तिच्या वडिलांनी चित्रीत केला अाणि तो व्हिडिओ जवळच्या मंडळींना दाखविला. याच भागात राहणारे काका महाराज आगळे, दादा महाराज सोनटक्के, संभाजी महाराज साळुंखे यांनी तिला प्रोत्साहन दिले. वडीलधाऱ्या मंडळींकडून मिळालेल्या प्रोत्साहनानंतर ती काही दिवसांतच हाती वीणा घेऊन कीर्तन सादर करण्यास उभी राहिली. समर्थ मंदिरात पहिल्यांदा कीर्तन सादर केले. तोंडपाठ असलेले अभंग, त्याच केलेले विस्तृत विवेचन, उत्तम उदाहरणे आणि दाखले देत तिने सर्वांची मने जिंकून घेतली.

Advertisement -

राजश्रीचे प्रबोधनात्मक स्वरूपातले कीर्तन हे थक्क करणारे आहे. अाता कमी वयात कीर्तन करणारी ती मराठवाड्यातील पहिली मुलगी म्हणून नावारूपाला येत आहे. सोशल मिडियावर तिचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिला कीर्तनासाठी परजिल्ह्यातून मागणी येत आहे. ती गेल्या ४ वर्षांपासून महाराष्ट्रभर कीर्तन सेवा करत आहे. सध्या ती वारकरी शिक्षण संस्थेत या क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे. भविष्यात तिला महाराष्ट्रभर कीर्तनाचे कार्यक्रम करण्याची करायचे अाहे.
यासाठी तिचे आईवडील तिला खूप मोठे प्रोत्साहन देत आहेत.
यासह तिला रामायणाचार्य हभप रामराजे महाराज राजेभोसले यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे.

अनिष्ट प्रथा-परंपरांवर करतेय प्रहार

आठवीत शिकणारी राजश्री आपल्या अभंग कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. ती केवळ भक्तिमार्गाचीच थोरवी सांगत नाहीत, तर त्यातून समाजातील प्रचलित अनिष्ट प्रथा-परंपरांवरही ती प्रहार करतेय. आजवर तिने पाणीप्रश्न, कृषी-योजना, राष्ट्रीय एकात्मता, महिला स्वातंत्र्य, भ्रूणहत्या असे अनेक विषय कीर्तनातून हाताळले आहेत. सध्या ती करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथे भक्ती वेदांत वारकरी गुरूकुल संस्थेत शिक्षण घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here