जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

वयाच्या 11 व्या वर्षी आपल्या वडिलाची डेअरी सांभाळणारी मराठमोळी श्रद्धा आज दरमहा 6 लाख रुपये कमवत आहे.!


 

अहमदनगर पासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या निघोज गावातील श्रद्धा धवन हि तिच्या परिश्रम व यशस्वीतेमुळे आज सर्वांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. सन १९९८ मध्ये काही अडचणी आल्याने तिच्या कुटुंबातील सहा म्हशीपैकी केवळ एकच म्हैस उरली होती. श्रद्धाचे वडील हे अपंग असल्यामुळे ते केवळ म्हशींचा व्यापार करत असत कारण त्यांच्यासाठी म्हशीचे दुध काढून मोटर सायकलवरून विकने हि गोष्ठ अशक्यच होती.

हि गोष्ठ आहे वर्ष २०११ ची ज्यावेळी श्रद्धाचे वय केवळ 11 वर्ष होते आणि तिने आपल्या जवळ असलेल्या म्हशींचे दुध काढून स्वतः दुचाकीवरून विकण्यास सुरुवत केली होती. एका मुलाखतीत श्रद्धाने सांगळे होते, माझे वडील हे अपंग असल्याने दुचाकी चालवू शकत नाहीत, आणि माझा भाऊ हा लहान असल्याने परिवाराच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर
घेण्यास सक्षम नव्हता. म्हणूनच माझ्या घराची जबाबदारी मी स्वतावर घेण्याचे ठरवले आणि वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षातच दुध काढून दुचाकीवरून विकण्यास सुरुवात केली. मला असे करताना थोडेसे विचीत्र् वाटत होते कारण असी काम यापूर्वी आमच्या गावातील कोणत्याही मुलीने केले नव्हते.

अगदी लहान वयात तिच्या वडिलांनी तिच्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करत श्रद्धाने आपले शिक्षण सुरु ठेवले होते, सर्व गोष्टीचे व्यवस्थापन करणे तिला आता चांगलेच जमले होते. आपले चांगले कर्म कधीच वाया जात नाहीत हे आज सर्वांना श्रद्धाच्या सफलतेने कळाले आहे. तिच्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे, आता तिचे कुटुंब तिच्या संघर्षामुळे मिळालेल्या यशाचा आनंद घेत आहे.

Advertisement -

श्रद्धा

बेटर इंडियाच्या एका वृतानुसार आज श्रद्धा तिच्या वडिलांचा व्यवासाय आपल्या दुमजली इमारतीतून चालवत आहे. तिच्याजवळ आजच्या वेळी ८० म्हशी आहेत आणि म्हशींसाठी बनवलेले शेड हे खूप मोठे आणि आधुनिक आहे याप्रकारचे हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिलेच शेड आहे. एक मुलगी हा व्यापार चालवत असल्याने तिची सर्वत्र चर्चा आहे, तिच्या या मेहनतीने कीतुम्बचि आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आणि महिन्याला 6 लाख रुपये ते कमवत आहेत.

श्रद्धाच्या डेअरीतील दुधाची गुणवत्ता अतिशय चांगली असल्यामुळे लोकांचा तिच्यावर विश्वास बसला होता आणि यामुळे तिचा दुग्ध व्यवसाय खूप वाढत गेला. श्रद्धा तिच्या जनावरांना केवळ सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चारा खायला घालतात जो कि त्यांच्या बाजूच्या शेतातच लावल्या जातो. जनावरांसाठी बनवलेले शेड दिवसातून दोन वेळा स्वच्छ केले जाते आणि
जनावरांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते.

श्रद्धाच्या फार्मवर ८० म्हशी आहेत त्यातून त्यांना ४५० लिटर दुध दररोज मिळते. म्हशी आणि दुसरी जनावरे वाढल्याने २०१९ मध्ये त्यांनी जनावरांसाठी दुसरा मजला बांधला आहे. कोणताही व्यवसाय हा लहान नसतो, केवळ आपण मनापासून मेहनत केली पाहिजे त्याचे फळ अवश्य मिळते हे श्रद्धाने संपन्न केलेल्या यशाने आपल्याला कळते. 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here