आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

असे करा भरघोस फायदा देणारी शिमला मिर्चीची लागवड आणि व्यवस्थापन, मिळेल दुप्पट फायदा!


 

आपण सामान्य पद्धतीने शेती करतो.वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या ही बऱ्याच करतो पण आम्ही तुम्हाला आता सांगणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीने घेऊ शकता. काही गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून ढोबळी मिर्चीमध्ये चांगले उत्पन्न मिळेल. ढोबळी मिरचीलाच आपण शिमला मिर्ची असेही म्हणतो.

या ढोबळी मिर्ची च उत्पन्न किंवा उत्पादन हे हवामानावर अवलंबून आहे. आपल्याला जेव्हा पण ढोबळी मिर्ची लागवड करायची आहे तेव्हा त्याची रोपं शक्यतो थंडी मध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये टाकावे लागते.

थंडीमध्ये रोप टाकले की याची रोपे येण्यासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी तरी लागतोच. चांगले उत्पन्न येण्यासाठी ढोबळी मिरची ची लागडवड ही तापमान दिवसा 25 सेल्सियस तर दिवसा 14 सेल्सियस एवढे असावे.

Advertisement -

शिमला मिर्चीची लागवड सामान्यतः अशा वेळेस करावी जेणेकरून त्याची काढणी जानेवारी फेब्रुवारी मध्ये काढता येईल.म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये याची लागवड करणे उत्तम ठरेल.शिमला मिर्ची

जमीन कसदार व सुपीक असावे. मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा करणारी जमीन उत्तम ठरेल.
लागवडीच्या अगोदर जमीन उभी आडवी नांगरून प्रति हेकटरी 15 ते 15 टन शेणखत टाकावे. दर हेकटरी 3 किलो बिया एवढे बियांचे प्रमाण ठेवावे .1 किलो बियाणे पेरण्यापूर्वी 2 ग्राम थायरम चोळावे.

बहुतांश वेळा ढोबळी मिर्ची हे चुरडा मुरडा रोगास बळी पडते त्यामुळे जमीन किंवा शेत कायम स्वच्छ ठेवावे. ढोबळी मिर्चीची काढणी ही फळे पूर्ण पणे हिरवीगार झाल्यानंतर आणि वाळल्यानंतर काढावी.फळे जास्त वेळ झाडाला ठेवू नये अन्यथा फळे झाडाला पिकतात.

शिमला मिर्ची

पण जरी फळ पिकली म्हणजेच पिकून लाल झाली तरी काही देशात लाल फळांना खूप मागणी आहे.शक्यतो फळे काढताना देठा सकट काढावी.जवळ जवळ 8 दिवसांनी फळांची काढणी करावी अशा 5 ते 6 काढणीनंतर सर्व पीक निघते. ढोबळी मिर्चीचे प्रति हेकटरी 17 ते 20 टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here