जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर माझ्या मेव्हण्याला ‘शेरशाह’मध्ये घे म्हणत सलमान खान गेला होता निर्मात्याच्या घरी..


‘शेरशाह’ प्रदर्शित झाला आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात त्या चित्रपटाला प्रतिसाद दिला. एकीकडे  सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाचे चाहते दिवाने होऊन प्रशंसा करत आहेत तर दुसरीकडे शेरशाह चे निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

‘शेरशाह’चे निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांनी खुलासा केला आहे की, सलमान खानला त्याचा मेहुणा ‘आयुष’ कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेसाठी निवडायचा होतो. या मागणीसाठी सलमान खानने निर्मात्याशी संपर्क देखील साधला होता. पुढे ही भूमिका सिद्धार्थ मल्होत्राकडे गेली. सिद्धार्थला त्याच्या चित्रपटातील अभिनयाची प्रशंसा मिळत आहे. अनेक लोक याला सिद्धार्थच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानत आहेत.

शेरशाह

शेरशाहचे निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांनी खुलासा केला आहे की सलमान खानने त्याच्याशी संपर्क साधून आयुषचे नाव चित्रपटासाठी सुचवले होते. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत शब्बीर म्हणाला, “मी जंगली पिक्चर्सशी बोलत असताना सलमानने माझ्याशी संपर्क साधला. शेरशाह हा आयुषचा पहिला चित्रपट असावा आणि त्यात माझा जोडीदार व्हावा अशी त्याची इच्छा होती. मात्र, विक्रम बत्रा यांच्या कुटुंबाची संमतीने सिद्धार्थ मल्होत्रा याला हा रोल देण्यात आला. यानंतर सिद्धार्थ आणि कुटुंबामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

Advertisement -

जेव्हा कॅप्टन बात्राच्या कुटुंबाने मला अधिकार दिले, तेव्हा तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. त्याने माझ्यावर खूप विश्वास ठेवला आणि मला कोणत्याही टप्प्यावर चूक करायची नव्हती. मी हे सलमानला समजावले आणि त्यालाही हे समजले. आयुष खूप गोड आहे, तो म्हणाला की पदार्पण चित्रपटात दुहेरी भूमिका करणे कठीण काम असते.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here