जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

गेल्या दीड वर्षापासून घरातच घट्ट बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?


 

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत जास्त नेते एकमेकांवर चिखलफेक करतांना नेहमीच दिसतात. कोन कोणाला कधी काय म्हणेल याचा काहीही नेम राहिलेला नाहीये. सध्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उपहासात्मक रित्या टीका केली आहे.

गणपती उत्सव संपला की लोकांना नवरात्रीचे वेध लागतं. यावेळी जागोजोगी देवीच्या स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. याच विषयाला धरून  मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री

Advertisement -

उद्यापासून घट बसतील परंतु गेली दीड वर्ष घरातच घट्ट बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, अशीही टीका शालिनी ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु अजुनही ओला दुष्काळ फंड जाहीर झाला नाही. अशावेळी सरकार काय करत आहे? राज्यात खड्डेमय रस्ते झाले असून त्यातून मार्ग काढताना नाकी नऊ येत आहे, असंही शालिनी ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या वर्षी तृतिया आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकाच वेळी आल्यामुळे नवरात्र उत्सव 8 दिवसांचा असणार आहे. यंदा विजयादशमी म्हणजे दसरा 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here