आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सोशल मीडियावर आपण रोज पाहतोय की काही न काही नवीन गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात त्यामध्ये असे काही लोक आहेत ते काही तरी जगावेगळं करतात आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून आपणास ते मनोरंजन करतात, आपण मागील काही महिन्यात जे लॉकडाउन पडले होते त्या सुद्धा पाहिले की घरी बसून काही न काही लोकांचे सारखे उद्योग चालू असायचे. आज एका व्यक्तीची कथा सांगणार आहोत हे ऐकून तुम्हाला एवढे हसू येईल की तुम्ही स्वतः म्हणाल की बाप रे काही पण लोक करतायत.

जिराफावर
जिराफावर

एक व्यक्ती जिराफ वर बसून त्याची सवारी करत आहे, हा व्हिडीओ खूप वायरल झाला असून लोक खूप म्हणजे खूप हसत आहेत. या व्यक्तीचा हा व्हिडिओ बाहेरच्या देशात आहे तो देश म्हणजे कजाकिस्तान.

एका प्राणी संग्रलयात एक व्यक्ती जिराफावर बसण्यासाठी पहिल्यांदा तो कुंपणावर चढतो आणि नंतर तो जिराफावर बसतो, असे सांगण्यात आले आहे की त्या व्यक्तीने नशा केली होती.

Advertisement -

काही वेळा नंतर जिराफ अस्वस्थ होते आणि इकडे तिकडे हलून त्या व्यक्तीला ते जिराफ खाली जमिनीवर पाडते. जेव्हा तो व्यक्ती जमिनीवर पडतो त्यावेळी देखील त्याचा नशा न उतरत नंतर तो कुंपणावर चढतो आणि जिराफावर जाऊन बसतो.

यावेळी त्या जीराफने त्या व्यक्तीला जोरात खाली पाडले, तो व्यक्ती सरळ उठला आणि तिथून निघून गेला त्यावेळी त्या घटना स्थळी अनेक लोक त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते.

मागील काही दिवसात इन्स्टाग्रामवर टर्किस्तान टुडे या नावाच्या पेज वर हा व्हिडिओ शेअर केला, हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप वायरल होत गेला. पोलिसांनी तिथे जाऊन या व्यक्तीची माहिती घेतली आणि सध्या पोलीस त्या व्यक्तीला शोधत आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here