ताज्या बातम्या व  जगभरातील रंजक माहिती करिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

चंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का?- संजय राऊत


येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं… तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक वार केला.

चंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का?

“मी काय कराव हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं… माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे…”, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांतदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला. “पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणारच… आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार”, असं संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांतदादा

तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले… आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू… तुम्ही तुमच बघा”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्या महापालिका निवडणूक लढण्याच्या चॅलेंजला संजत राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

Advertisement -

राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांतदादांचं राऊतांना निवडणूक लढण्याचं आव्हान

जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं.


ताज्या बातम्या:

खेळरत्न पुरस्कार निर्णयाचे स्वागतच, आता नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदला, कॉंग्रेसच्या या जेष्ठ नेत्याची मागणी..!

जनतेच्या इच्छेखातर पुरस्काराचे नाव बदलले, तर तुम्ही राजीनामा द्यावा हीही जनतेची इच्छा-रुपाली चाकणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here