जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य खरच वेगळे होणार? पोस्ट शेअर करत स्वतः अभिनेत्रीने केला हा खुलासा.


 

दक्षिणची प्रसिद्ध जोडी समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य हे आजकाल हेडलाईन्सचा भाग आहेत. काही दिवसांपासून सामंथा आणि नागा यांच्यात काहीतरी बिघडले असून त्यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अशा परिस्थितीत,सामंथाने या सर्व बातम्यांचा शेवट करत एक पोस्ट शेअर केली. ज्याला नागाने उत्तर दिले आहे आणि प्रत्येकाचे तोंड बंद केले आहे.

नागा चैतन्यच्या आगामी चित्रपटाची ट्रेलर नुकतीच प्रदर्शित झाली आहे. समंथाने चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून सर्वांना शांत केले. लव्ह स्टोरीचा ट्रेलर शेअर करताना तिने लिहिले विजेता, “लव स्टोरी की पूरी टीम को शुभकामनाएं.”

नागा चैतन्यनेही त्यांच्या नात्याबद्दल येणाऱ्या बातम्यांवर मौन पाळले. आता त्याने समंथाच्या पोस्टला प्रत्युत्तर देऊन सर्वांना शांत केले आहे. समंथाचे ट्विट शेअर करताना त्याने लिहिले. थँक्यू सॅम.

Advertisement -

शेखर कम्मूला यांनी लव्ह स्टोरी हा चित्रपट केला आहे. तो सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्यात नागासोबत साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

समंथा अक्किनेनी

काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की दोघे घटस्फोट घेणार आहेत. यामागचे कारण सांगण्यात येत होते की नागांना त्यांचे कुटुंब पुढे नेण्याची इच्छा आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवायचा असेल तर नागांना आता कुटुंब नियोजन करायचे आहे. ज्यासाठी त्याला समंथाला काही काळ चित्रपटांमधून विश्रांती घेऊन कुटुंबाला पुढे नेण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर सामंथाला सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मात्र दोघांनीही या अहवालांवर अद्याप  प्रतिक्रिया दिलेली नाही.

जुलैमध्ये, सामंथाने तिचे आडनाव अक्किनेनी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काढून टाकले होते. आता त्याच्या सोशल मीडिया पेजचे नाव एस एवढचं आहे . सामंथाचे आडनाव काढून टाकल्यानंतर त्यांच्या नात्याविषयीच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

पण यावर आता कसलाही पडदा उरला नाहीये. या दोघांमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याखऱ्या नसल्याचं म्हटलं जात आहे..

वर्कफ्रंटबद्दल बोलताना, सामंथाने तिचे डिजिटल पदार्पण केले आहे. ती वेब सीरिज द फॅमिली मॅन सीझन 2 मध्ये मनोज बाजपेयीसोबत दिसली. सामंथाच्या या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here