जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

भारत आणि पाकिस्तान मध्ये धावायची ही एकमेव रेल्वेगाडी, या कारणामुळे झाली कायमची बंद..!


फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जास्तच बिघडतच गेले. बरेच प्रयत्न करूनही हे संबंध सुरळीत चालले जात नवते. यात सर्वांत महत्वाचा मुद्दा होता तो काश्मीर. काश्मीरमुळे नेहमीच या दोन देशांमध्ये  तणाव निर्माण होत आला आणि तो वाढतच गेला.

भारताच्या सीमेवर ओढलेल्या रेषेचा परिणाम असा झाला की एक देश कायमचे दोन तुकडे झाले. काही भाग द्वेषाचा, काही प्रेमाचा, काही विभक्तीचा, काही समानतेचा होता. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर दोन्ही देशांना एकसंध ठेवण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी ‘समझौता एक्स्प्रेस’ ही एक होती.

1971 मध्ये बांगलादेश युद्धाचे परिणाम मागे घेण्यासाठी ‘शिमला करार’ करण्यात आला होता. या शांतता करारांतर्गत ‘समझौता एक्सप्रेस’ची पायाभरणी झाली. ‘समझौता एक्सप्रेस’ म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोन देशांना जोडणारा रेल्वे प्रवास. त्यामुळे या ट्रेनला ‘मेसेज ऑफ पीस’ असेही म्हटले गेले.

रेल्वे

Advertisement -

दुर्दैवाने 8 ऑगस्ट 2019 रोजी समझौता एक्सप्रेसची सेवा कायमची निलंबित करण्यात आली. याचं कारणही पुढे सांगेन, पण या ‘करार’च्या इतिहासाचा प्रवास कुठून आणि कसा सुरू झाला हे आधी जाणून घ्या.

समझौता एक्स्प्रेस 22 जुलै 1976 रोजी ‘शिमला एकॉर्ड’ अंतर्गत धावू लागली. शिमला करार 1972 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात झाला होता. समझौता एक्स्प्रेस भारताची राजधानी दिल्ली ते सीमेवरील अटारी आणि त्यानंतर पाकिस्तानमधील लाहोरपर्यंत धावली.

सुरुवातीला ही ट्रेन अमृतसर ते लाहोरपर्यंत धावत असे. नंतर 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात पंजाबमध्ये तणाव वाढल्याने, भारतीय रेल्वेने अटारी येथून धावणे बंद केले आणि जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावरून धावण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर आधी ही ट्रेन रोज भारत-पाकिस्तानला जायची पण 1994 नंतर आठवड्यातून फक्त 2 दिवस धावू लागली. लाहोरहून येणारी ट्रेन सोमवार आणि गुरुवारी धावत असे तर दिल्लीहून येणारी ट्रेन दर बुधवारी आणि रविवारी धावत असे.

या एक्स्प्रेसमध्ये 6 स्लीपर कोच आणि एक एसी 3-टायर कोचचा समावेश होता. ही रेल्वे सेवा भारतीय रेल्वे आणि पाकिस्तान रेल्वे यांच्यात झालेल्या कराराने स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये एकावेळी ६ महिने ट्रेनमध्ये भारतीय रेल आणि लोकोमोटिव्हचा वापर केला जात होता आणि उर्वरित ६ महिने पाकिस्तानचा त्यामुळे सहा महिने ते भारतीय रेल्वे आणि सहा महिने पाकिस्तान रेल्वेने चालवले होते.

समझौता एक्स्प्रेस सेवा का बंद झाली?

8 ऑगस्ट 2019 रोजी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतरच समझौता एक्स्प्रेसची सेवा बंद केली.

तत्कालीन रेल्वेमंत्री शेख रशीद अहमदयांनी या संदर्भात स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, भारताने काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन सुरूच ठेवले आहे म्हणून यापुढे आम्ही केवळ प्रेक्षक बनून राहणार नाही. जोपर्यंत मी रेल्वे मंत्री आहे तोपर्यंत समझौता एक्स्प्रेस यापुढे धावणार नाही.

तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान चालणारी ही गाडी कायमची बंद झाली.


==

आमचे नवनवीन लेख

वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here