जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

समीर वानखेडेच्या बचावासाठी पत्नी क्रांती रेडकर आली समोर, लग्नाचा फोटो पोस्ट करत दिली ही महत्वपूर्ण माहिती.!


शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या  ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे सध्या चर्चेत आहेत. वानखेडेंमुळे त्यांची पत्नी आणि मराठी मनोरंजन क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारी क्रांती रेडकरदेखील चर्चेत आहे. समीर वानखेडेंवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केले आहेत.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे मॅरेज सर्टिफिकेट ट्विटरवर पोस्ट केलं होतं. या फोटोवर नवाब मलिक यांनी पहचान कौन? असं कॅप्शन दिलेलं. त्यावर क्रांती रेडकरने पती समीर यांच्यासोबतचे लग्नाचे फोटो शेअर करत नवाब मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधत फ्रॉडला इथून सुरुवात होते असं म्हटले होतं. नवाब मलिकांनी शेअर केलेल्या मॅरेज सर्टिफिकेटच्या फोटोमध्ये वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ‘दाऊद के वानखेडे’ असं असल्याचं दिसत आहे. तर त्यांच्या आईचं नाव ‘झहीदा’ असल्याचं यामध्ये दिसत आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा आणखी फोटो पोस्ट केला आहे. तो त्यांच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचं दिसत आहे. या फोटोवर नवाब मलिक यांनी पहचान कौन? असं कॅप्शन दिलं आहे.

समीर वानखेडे

Advertisement -

क्रांती रेडकरने नबाव मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. क्रांती ट्वीट करत म्हणाली, मी आणि समीर जन्मानं हिंदूच, कधीही धर्म बदलला नाही.” एकीकडे क्रांती रेडकरच्या फोटोंवर चाहते सत्यमेव जयते अशा प्रकरच्या कमेंट्स करत तिला सकारात्मक उर्जा देत आहेत.

समीर वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी “आपण न्यायालयात उत्तर देऊ”,असं म्हटलं आहे. दरम्यान समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनेदेखील समीर यांच्यासोबतचे लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here