जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड परतला घरी,झाले जंगी स्वागत,पहा व्हीडीओ..


आयपीएलच्या संपूर्ण हंगामात आपल्या क्रिकेट खेळीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार चेन्नई सुपर किंग्जल सलामीवीर फलंदाज मराठमोळा ऋतुराज गायकवाड आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर मायदेशी परतला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आणि यंदाचा ऑरेंज कॅपचा मानकरी ऋतुराज गायकवाड त्याच्या घरी परतला.

यंदाच्या आयपीएल मध्ये तर सर्वाधिक धावा करण्याचा मान ही त्यालाच मिळाला, त्याच खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये बाजी मारली. करिअरमधील सर्वोत्तम खेळी करून तो पिंपरी चिंचवडच्या घरी परतला तेंव्हा मात्र गाडीतून तो रिकाम्या पायाने उतरला.

ऋतुराज गायकवाड

दारात उतरताच त्याचे मराठमोळ्या परंपरेने स्वागत करण्यात आले. सर्वांत महत्वाचे म्हणजे जेव्हा ऋतु गाडीतून उतरला तेव्हा पायात चप्पल न घालता खाली उतरला. कारण त्याची आई त्याचे स्वागत ओवाळून करणार हे त्याला अगोदरच माहिती होते आणि झालेली तसेच..

Advertisement -

ऋतुराजच्या पिंपरी चिंचवडच्या घरी नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी ऋतुराजच जंगी स्वागत केलंय. दारात गाडीतून खाली उतरताच त्याच्या आईने त्याचे औक्षण करत स्वागत केले. सर्वांनी त्याला पेढे खाऊ घालत पुढील कामगिरीसाठी शुभेछ्या दिल्या.

ऋतुराज ठरला ऑरेज कयॅप चा मानकरी.  

आयपीएल 2021 स्पर्धेतील मानाची समजली जाणारी ऑरेज टोपी ऋतुराजल मिळाली आहे. या स्पर्धेच्या एका हंगामात सर्वांत जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला ही टोपी दिली जाते. यावर्षी ऋतुराजने तिच्यावर आपल नाव कोरले.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here