जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जनतेच्या इच्छेखातर पुरस्काराचे नाव बदलले, तर तुम्ही राजीनामा द्यावा हीही जनतेची इच्छा-रुपाली चाकणकर


क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणारा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ याचं नाव बदलण्यात आलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या पुरस्काराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मात्र यावरून मोदींवर काँग्रेस टीका करत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही मोदींवर टीका केली आहे.

जनतेची मागणी म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे, चांगलं आहे. जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात चाकणकर यांनी टीका केली आहे.

रूपाली चाकणकर

Advertisement -

नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयावरून त्यांना काँग्रेस पक्षाने धारेवर धरलं आहे. केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिलं आहे.

राजीव गांधी यांचं देशाच्या विकासातील योगदान आणि करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठं असून अशा पद्धतीने ते स्थान तसूभरही कमी होणार नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रूपाली चाकणकर यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here