जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

रामायण मालिकेतील रावण अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूची बातमी ठरली अफवा.!


 

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी आता ८२ वर्षांचे झाले आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्या मृत्यूची अफवा सोशल मिडीयावर पसरली होती. यानंतर रामायणात लक्ष्मनाची भूमिका साकारलेल्या सुनील लहरी यांनी ही बातमी खोटी असल्याचे आणि अशा अफवा पसरवण्याचे आवाहन केले होते.

 

अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूची ही अफवा प्रथमच नाही उडाली तर यापूर्वी सुद्धा अनेकवेळा अशा खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी त्यांच्या भावाने एक ट्वीट करून ही एक अफवा असल्याचे स्पष्ठ केले होते.

 

रामायण

 

रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद जी हे असली जीवनात भगवान श्रीराम यांचे भक्त आहेत. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९३८ रोजी उज्जेन येथे झाला होता. त्यांन त्यांच्या गावात एक राम मंदिरही बनवलेअहे आणि त्याठिकाणी ते नित्यनियमाने पूजा पाठ सुद्धा करतात.

 

अरविंद त्रिवेदी यांचे वय आता ८२ वर्ष झाले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यात फार बदल झाला आहे, त्यामळे त्यांना ओळखणे थोडे कठीन आहे. रामायणातील त्यांचा लंकेश रावणाचा अभिनय पाहून मनात भीती निर्माण होत असे, परंतु त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ आहे .

 

रामायण

 

अरविंद जी हे गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्याचे खासदार सुद्धा राहिले आहेत. १९९१ ते १९९६ यादाराम्यान्ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडू आले होते. यादरम्यान अरविंद त्रीव्डी यांनी आपल्या लेखात लिहिले होते कि, मला याच रावणाच्या भूमिकेमुळे खासदार बनण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आणि माझे मित्र राजेश खन्ना यांनी एक मजेदार टिपणी केली होती  (भारतीय जनता पार्टीने प्रभू श्रीराम यांच्या नावाने निवडणूक लढवली आणि रावणाला लोकसभेचे तिकीट दिले)

 

अरविंद जी यांना गुजरात सरकार आणि जगातील अनेक संस्थांनी सन्मानित आणि पुरस्कृत केले आहे. गुजराती आणि हिंदी चित्रपटात काम करणारे अरविंद जी हे अनेक सामाजिक संस्थांशी जुडलेले आहेत. त्यांनी आपल्या जीवनात ‘देश रे जोया दादा’ ‘परदेस जोया’, ढोली, मणियारो, संतु रंगीली यांसारख्या गुजराती चित्रपटात काम केले आहे. त्याचा अभिनय पाहुनच त्यांना रामायणातील रावणाच्या भूमीकेसाठी निवडले होते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here