क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

राजस्थान रॉयल्सची दमदार सुरवात, यशस्वी जयसवालच्या ताबडतोब फलंदाजीने रॉयल्स चांगल्या स्थितीत..


आयपीएल 2021 च्या 32 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने चांगली सुरुवात केली आहे. राजस्थानने तीन विकेट गमावून 100 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि लियाम लिव्हिंगस्टोन क्रीजवर आहेत. लुईस (36) नंतर कर्णधार सॅमसन चार धावांवर बाद झाला.

राजस्थानची धावसंख्या 100 च्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर यशस्वी जयस्वाल त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या अर्धशतकाच्या जवळ आहे.

राजस्थान रॉयल्स

10 षटकांनंतर राजस्थानने दोन गडी गमावून 94 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल नाबाद 40 आणि लियाम लिव्हिंगस्टोन 9 धावांवर नाबाद आहेत.

Advertisement -

यशस्वी जैस्वालची उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर (आदिल रशीद) त्याने डीप स्क्वेअर लेगमध्ये शानदार षटकार ठोकला. त्याने आतापर्यंत दोन षटकार मारले आहेत.


हेही वाचा:

MI vs CSK live: थाला पुन्हा फेल! जीम्मेदारीच्या वेळी धोनीने टाकली स्वतःची विकेट,चाहते नाराज..

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here