क्रीडा क्षेत्रातील माहिती व बातम्या वाचण्यासाठी आजच पेज लाईक करा.

=====

लिओनेल मेस्सीला मागे टाकत ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू


‘मँचेस्टर युनायटेड’ मध्ये प्रवेश केल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोचे भाव वधारलेले पाहायला मिळाले आहेत. फोर्ब्जच्या यादीत लिओनेल मेस्सीला मागे टाकत ख्रिस्तियानो रोनाल्डोने ‘सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू’ हा किताब जिंकला आहे. फोर्ब्जने नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉलपटूंची आपली यादी जाहीर केली आहे. यात रोनाल्डोने बाजी मारलेली दिसून आली.

 

२०२१-२२ मध्ये रोनाल्डोची १२५ मिलियन डॉलर्स (टॅक्स वजा न जाता) इतकी कमाई होणार असल्याचे बोलले जात आहे. यापैकी ७० मिलियन डॉलर्स हे त्याचे मानधन असेल, तर बाकी पैसे हे त्याला ‘मँचेस्टर युनायटेड’ मध्ये प्रवेश केल्याबद्दल बोनस म्हणून दिले जातील. या ३६ वर्षीय खेळाडूला जाहिरातींमधून अंदाजे ५५ मिलियन डॉलर्सची कमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cristiano Ronaldo Lionel Messi

Advertisement -

याउलट त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू लिओनेल मेस्सीची २०२१-२२ मधील कमाई ११० मिलियन डॉलर्स इतकी असेल. यापैकी ७५ मिलियन डॉलर्स हे त्याचे मानधन असणार असून बाकी पैसे हा त्याचा बोनस असेल. ‘पॅरिस सेंट-जर्मन’ क्लबतर्फे खेळताना विविध प्रकारच्या जाहिरातींमधून त्याला अंदाजे ३५ मिलियन डॉलर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

फोर्ब्जच्या यादीनुसार, जगातील सर्वाधिक कमाई करणारे १० फुटबॉलपटू यंदाच्या सिझनला एकूण मिळून ५८५ मिलियन डॉलर्सची कमाई करतील. गेल्या वर्षी हाच आकडा ५७० मिलियन डॉलर्सच्या आसपास होता.


हेही वाचा:

या भारतीय क्रिकेटपटूकडे आहेत स्वतःचे प्रायवेट जेट, किंमत जाणून फिरतील डोळे..!

संतापजनक! इंग्लंडच्या प्रेक्षकांचं पुन्हा अशोभनीय कृत्य, सीमारेषेवर मोहम्मद सिराजवर फेकल्या वस्तू..

आरसीबी (RCB) कोरोना वॉरियर्सला सलाम करते: कोहलीची टीम आयपीएल सामन्यात लालऐवजी पीपीई किटसह निळी जर्सी परिधान करेल. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here