आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

दुसऱ्याची कॉपी करून नाही तर,आपल्या अकलेने यशस्वी होणार ; रोहित शर्माने सांगितली पुढची योजना..!


टी-२० विश्वचषकाच्या रुपात आणखी एक आयसीसी स्पर्धा पार पडली आणि भारताची झोळी रिकामीच राहिली. 2013 च्या शेवटच्या विजेतेपदापासून भारतीय संघ ट्रॉफीची वाट पाहत होता, परंतु गेल्या 6 वेळा प्रमाणेच या वेळी T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघ निराश होऊन परतला.

आता पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी काही बदल होणार आहेत आणि त्यात पहिला बदल नेतृत्व पातळीवर करण्यात आला आहे. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा भारतीय T20 संघाचा कर्णधार बनला आहे. दुसरा बदल, ज्याची सर्वात जास्त गरज आहे,तो म्हणजे टीम इंडियाच्या खेळाची पद्धत किंवा रणनीती.

विजेतेपदाच्या शोधात भारतीय संघ आपल्या खेळाचा साचा बदलणार का? यश मिळवणाऱ्या संघांच्या दृष्टिकोनाचे तुम्ही अनुसरण कराल का? संघाच्या नव्या कर्णधाराने यावर आपले मत स्पष्ट केले आहे.

भारतीय संघाचा नवा T20 आंतरराष्ट्रीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला आहे की संघाला काही सुधारणेची गरज आहे, परंतु तो आता संघातील खेळाडू  स्वतःच्या पद्धतीने वापरून पाहणार आहे.टी-20 मध्ये एकदिवसीय-शैलीचे क्रिकेट खेळल्याबद्दल भारतीय संघाला सतत दोष दिला जातो आणि मोठ्या सामन्यांमध्ये त्याचा फटका संघाला सहन करावा लागतो.

टी-20 विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्येही हेच दिसून आले, जिथे संघ दबावाच्या परिस्थितीतून लवकर बाहेर पडण्यात अपयशी ठरला आणि त्यामुळे पहिल्याच फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला.

Advertisement -

रोहित शर्मा
अशा परिस्थितीत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवा साचा स्वीकारेल का? भारतीय संघ इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टाईलने खेळेल का? हा प्रश्न प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे आणि असाच प्रश्न रोहितला त्याच्या जयपूर येथील पहिल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला आणि त्याला उत्तर देताना भारतीय कर्णधार म्हणाला

“आम्ही आयसीसी स्पर्धा जिंकल्या नाहीत पण एक संघ म्हणून चांगले खेळलो. काही किरकोळ उणिवा आहेत त्या दुरुस्त कराव्या लागतील. एक संघ म्हणून हे आमचे सर्वात मोठे आव्हान असेल. आपण स्वतःचे टेम्पलेट तयार केले पाहिजे, इतरांची कॉपी करू नये.”

आजपासून सुरु होणार भारत -न्यूझीलंड मालिका

आता भारतीय संघाची नवी शैली काय असेल, त्याची झलक येत्या काही दिवसांत पाहायला मिळेल. भारतीय संघ बुधवार १७ डिसेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेला सुरुवात करत आहे. अशा परिस्थितीत पहिल्या सामन्यात कोणताही बदल अपेक्षित नाही आणि टीम इंडियाच्या कार्यपद्धतीत काही बदल झाला तरी पहिल्या सामन्यातून किंवा पहिल्या मालिकेतूनच त्यावर कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. त्यामुळे या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या विकासासाठी पुढील काही महिने महत्त्वाचे आहेत.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here