आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

====

न्युझीलंडची बत्ती गुल! तिन्हीही सामने जिंकत टीम इंडिया विजयी, कर्णधार रोहित शर्माने या खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय…


भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या T20 मध्ये न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव करत मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. ईडन गार्डन्स मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गडी गमावून १८४ धावा केल्या आणि त्यानंतर १७.२ षटकांत न्यूझीलंडचा डाव १११ धावांत गुंडाळला. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिलने 51 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने ३ बळी घेतले. न्यूझीलंडवर क्लीन स्वीप केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने अजूनही संघाला मधल्या फळीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मान्य केले. व्यंकटेश अय्यर संघासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

रोहितने खास करून युवा खेळाडूंच्या कामगिरीवर चांगली प्रतिक्रिया दिली. रोहित म्हणाला कि येणाऱ्या काही काळात भारतीय संघात या युवा खेळाडुंच योगदान महत्वाच असणार आहे.

रोहित शर्मा

सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘चांगली सुरुवात करणे नेहमीच महत्त्वाचे असते. दव असल्यामुळे चेंडू बॅटवरही चांगला येतो. होय, मधल्या फळीत अजूनही सुधारणेची गरज आहे, पण खालच्या फळीने चांगला खेळ केला. हर्षल पटेलने या मालिकेत चांगली गोलंदाजी केली.

त्याच्यासह चहल, अक्षर पटेल आणि अश्विन या तिन्ही फिरकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. केएल राहुल उत्कृष्ट होता आणि व्यंकटेश अय्यर आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आमचे गोलंदाजही चांगली फलंदाजी करत आहेत हे आमच्यासाठी चांगले आहे आणि आगामी काळात हाच संघाचा साचा असेल.

Advertisement -

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here