आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या देशात लग्न झाले की तीन दिवस नवरदेव- नवरीला टॉयलेटला जाऊ दिले जात नाही.


प्रत्येक देशात त्यांच्या धर्मानुसार लग्न केले जाते त्यांची जी परंपरा चालत आलेली असते त्यामुळे ते ते लोक त्या धर्मातील नियमांचे पालन करून आपल्या आपल्या विधी उरकतात. कारण कुटुंबातील लोकांना भीती असते की आपण जर या नियमांचे पालन न करता विधी जर नाही केले तर पती पत्नीनं पुढे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

तुम्हाला सांगायचे झाले तर जे परंपरा नुसार नियम आलेत ते आपण पाळले पाहीजेत पण दुसऱ्या ठिकाणी जे आपल्या धर्मातील लोकांनी विचित्र काही नियम केलेत ते आजकाल आपल्याला दिसून येत आहेत, आणि त्यामधील एक असा नियम निर्देशात आलेला आहे आणि सध्या तो सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. हा नियम ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल आणि म्हणाल की बाप रे हे काय नवीन. होय हा नियम असा की नवीन लग्न झालेल्या पती पत्नीने तीन दिवस टॉयलेट ला जायचं नाही, बसला ना तुम्हाला पण हे ऐकून धक्का.

 

Advertisement -

 

होय इंडोनेशिया मध्ये ही एक विधी च म्हणावी लागेल जे लोक पाळतात, ही विधी इंडोनेशिया मधील टीडॉन्ग समाजात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या विधिनुसार तेथील पती पत्नी याना तीन दिवस टॉयलेट ना जाणे निर्बंध आहेत, आणि जर या नियमाला जर कोणी तोडले तर त्याला अपशकुन मानले जाते.

टीडॉन्ग समाजातील लोकांचे असे म्हणणे आहे की जर टॉयलेट ला गेले तर ते अपवित्र मानले जाते, टॉयलेट ला गेले की पवित्रता नष्ट होईल आणि पती पत्नी अशुद्ध होतील. त्या लोकांचे असे सुद्धा म्हणणे आहे की घरातील सर्व लोक टॉयलेट चा वापर करतात आणि त्यामुळे तिथे नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि हे पती पत्नीला अपवित्र ठरते.

त्या टॉयलेट ला जर नवीन पती पत्नी ने वापरले तर ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे त्यांच्यामध्ये जाते, आणि यामुळे पती पत्नीच्या मधील नाते तुटू शकते. फक्त एवढंच नाही यामुळे पती किंवा पत्नी यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तसेच नवीन जोडप्याला काही असे खाण्याचे पदार्थ असतात ते सुद्धा दिले जात नाहीत, कारण जास्त खाणे दिले तर टॉयलेट ला लागेल म्हणून तीन दिवस जास्त जड अन्न पाहून देत नाही आणि ती विधी पूर्ण केली जाते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here